महादेव हॉस्पिटल ठरतेय रुग्णांसाठी आशेचे केंद्र ; न्यूरोलॉजी विभागात सर्वाधिक रुग्ण

जून 9, 2026 4:55 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव शहरात मध्यवर्ती ठीकाणी आकाशवाणी चौकात महादेव हॉस्पिटल अत्याधुनिक वैद्यकीय सुविधांसह दर्जेदार आरोग्यसेवा दिल्याने आशेचे केंद्र ठरले आहे. महादेव हॉस्पिटलमध्ये तज्ज्ञ डॉक्टर, अत्याधुनिक यंत्रसामग्री आणि २४ तास उपलब्ध वैद्यकीय सेवा यामुळे जळगाव व परिसरातील रुग्णांना गुणवत्तापूर्ण उपचार मिळत असून रुग्णांचा विश्वास अधिक दृढ होत आहे. रूग्णालयातील न्युरोलॉजी विभागात सर्वाधिक रूग्ण दाखल झाले आहे.

mhj

जळगावातील महादेव सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलने आरोग्यसेवेच्या क्षेत्रात आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकत विविध सुपर स्पेशालिटी विभागांच्या माध्यमातून रुग्णांना अत्याधुनिक उपचार सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. आकाशवाणी चौक परिसरातील महादेव हॉस्पिटलमध्ये हृदयरोग, किडनी विकार, न्यूरो सायन्स, जनरल मेडिसीन, जनरल सर्जरी, अस्थिरोग,कान,नाक घसा, अतिदक्षता विभाग, आपत्कालीन सेवा तसेच विविध निदान सुविधा एकाच छताखाली उपलब्ध होत आहेत.

रुग्णांना मोठ्या शहरांमध्ये जाण्याची गरज कमी व्हावी आणि स्थानिक स्तरावरच गुणवत्तापूर्ण उपचार मिळावेत, या उद्देशाने हॉस्पिटलमध्ये आधुनिक वैद्यकीय यंत्रसामग्री, अनुभवी तज्ज्ञ डॉक्टर आणि प्रशिक्षित वैद्यकीय कर्मचारी कार्यरत आहेत. विशेषतः न्युरोलॉजी, हृदयरोग व किडनीविकारांवरील उपचारांसाठी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.महादेव हॉस्पिटलमध्ये २४ तास आपत्कालीन सेवा, अत्याधुनिक अतिदक्षता विभाग, निदान केंद्र, औषधालय तसेच विविध शस्त्रक्रियांसाठी सुसज्ज ऑपरेशन थिएटरची सुविधा उपलब्ध आहे.

रुग्णकेंद्रित सेवा, अचूक निदान आणि वेळेवर उपचार यावर हॉस्पिटलचा विशेष भर असून परिसरातील नागरिकांचा विश्वास संपादन करण्यात हॉस्पिटल यशस्वी ठरत आहे.हॉस्पिटल प्रशासनाने सांगितले की, आगामी काळात आणखी काही विशेष तज्ज्ञ सेवा सुरू करण्याचा मानस असून उत्तर महाराष्ट्रातील रुग्णांना सर्वोत्तम आरोग्यसेवा देण्यासाठी महादेव हॉस्पिटल कटिबद्ध आहे. अशा सुविधांमुळे जळगाव आणि परिसरातील नागरिकांना महानगरांच्या तोडीची आरोग्यसेवा आपल्या शहरातच उपलब्ध होत आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now