⁠ 
शुक्रवार, मार्च 29, 2024

मान्सूनची सुरुवातीलाच जळगावकडे पाठ : जिल्ह्यात कधी बरसणार पाऊस? वाचा हवामान खात्याचा अंदाज

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ जून २०२२ । राज्यात सर्वदूर मान्सूनने हजेरी लावली असली तरी आता पावसाने ब्रेक घेतल्याचं पाहायला मिळत आहे. हवामान विभागाने (Meteorological Department) गत आठवड्यापासून १५ जूनपर्यंत राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविला होता. मात्र दोन दिवसांतच मान्सूनने सुट्टी टाकल्याचं पाहायला मिळत आहे. दोन दिवसापूर्वी खान्देशातील जळगाव जिल्ह्यात मान्सून दाखल झाला होता. पण मान्सूनने (Monsoon) सुरुवातीलाच जिल्ह्यात हुलकावणी दिली. दरम्यान, आयएमडीच्या अंदाजानुसार आज बुधवार आणि गुरूवारी जिल्हाभरात चांगला पाऊस हाेण्याची शक्यता आहे. Monsoon Update News in Jalgaon

गेल्या आठवड्यात राज्यात मान्सून दाखल झाला होता. त्यानंतर मान्सूनचा वेग वाढला आणि मुंबईतून (Mumbai) अवघ्या तिसऱ्याच दिवशी मान्सून खान्देशात दाखल झाला. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार दाेन दिवस उशिराने मान्सून अखेर साेमवारी खान्देशात दाखल झाला. जळगाव जिल्ह्यात मान्सून दाखल झाला असला तरी सध्या मान्सूनने हुलकावणी दिली.

दरम्यान, आज आणि उद्या जिल्हाभरात चांगला पाऊस हाेण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली असली तरी पुढील पाच दिवसात जळगावात ‘नो वार्निंग’ म्हणजेच पावसाची शक्यता नसल्याचे हवामान खात्याच्या अधिकृत वेबसाइटवरून दिसून येतेय. त्यामुळे जळगावकरांना मान्सूनच्या पावसासाठी प्रतीक्षा करावी लागू शकते.

राज्यात मान्सूनच्या या ब्रेकमुळे शेतकऱ्यांनाही पेरणी थांबण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. खरंतर, येत्या ४८ तासांत तयार होणाऱ्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मान्सून सक्रिय होईल, असाही अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. पण सध्या मान्सूनला लो करंट आहे. म्हणून पाऊस पडण्यासाठी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची गरज आहे. पण तसं होत नसल्याने सध्या मान्सूनने विश्रांती घेतली आहे.