⁠ 
शनिवार, एप्रिल 20, 2024

मान्सून गोव्याच्या सीमेवर रेंगाळला ! महाराष्ट्रातील आगमनासाठी आता ‘हा’ आहे नवा मुहुर्त?

जळगाव लाईव्ह न्यूज । ७ जून २०२२ । देशात वेळेपूर्वी मान्सून (Monsoon) दाखल झाला असला तो गोव्याच्या सीमेवर रेंगाळला आहे. यामुळे महाराष्ट्रातल्या आगमनासाठीचा नवा मुहूर्त ठरला आहे. मान्सूनला पुढे सरकण्यासाठी अनुकूल वातावरण मिळाल्यास 12 ते 13 जूनच्या आसपास मान्सून राज्यात येण्याची शक्यता आहे. तर सध्या काही भागात उष्णतेचा कहर वाढलेला दिसून येतोय. दरम्यान, जळगाव, नाशिक, पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यात विजांच्या कडकडाटात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. Monsoon Update Maharashtra News

मान्सूनची सर्वचजण पावसाची चातकासारखी वाट पाहत आहेत. एकीकडे मान्सूनच्या तोंडावर राज्यात मात्र उष्णतेची लाट (Heat Wave) जाणवत आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या महाराष्ट्रातील प्रवेशाला सध्या अडथळा निर्माण झाला आहे. यंदा मान्सून लवकर दर्शन देणार, असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला होता. पण मान्सून मात्र अद्याप महाराष्ट्राच्या सीमेवरच रेंगाळला आहे. काही दिवसांपासून मान्यून कर्नाटकातील कारवारमध्ये अडकला होता. आता तो मान्सून गोव्याच्या सीमेवर रेंगाळला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील आगमनासाठी आता नवा मुहुर्त देण्यात आला आहे.

नव्या मुहूर्तावर राज्यात आता तो १२ ते १३ जूनपर्यंत दाखल होण्याचा अंदाज आहे. यापूर्वी तो ७ जूनपर्यंत दाखल होण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला होता. दरम्यान, राज्यात जळगाव, नाशिक, पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यात ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वारे वाहणार असून विजांच्या कडकडाटात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. विदर्भातील नागपूर, वर्धा, गोंदिया, चंद्रपूर, अमरावती या जिल्ह्यांत उष्णतेच्या लाटेचा इशारा नागपूर वेधशाळेने दिला आहे.