⁠ 
शनिवार, नोव्हेंबर 23, 2024
Home | कृषी | Monsoon Updates : जिल्ह्यात पावसाचा जोर ‘या’ तारखे नंतरच वाढणार

Monsoon Updates : जिल्ह्यात पावसाचा जोर ‘या’ तारखे नंतरच वाढणार

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १ जुलै २०२२ ।  जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हजेरी लावणारा वरुण राजा आता नागरिकांवर नाराज होणार आहे. करणं पाऊस पुढचे सहा दिवस दडी मारण्याची शक्यता आहे. ६ जुलैनंतरच जिल्ह्यात पावसाचा जाेर वाढू शकताे असा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे. Monsoon Update News Jalgaon.

राज्यात सर्वदूर मान्सूनने हजेरी लावली असली तरी आता पावसाने ब्रेक घेतल्याचं पाहायला मिळत आहे. हवामान विभागाने (Meteorological Department) गत आठवड्यापासून १५ जूनपर्यंत राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविला होता. मात्र मान्सूनने सुट्टी टाकल्याचं पाहायला मिळत आहे. नुकताच खान्देशातील जळगाव जिल्ह्यात मान्सून दाखल झाला होता. पण मान्सूनने (Monsoon) सुरुवातीलाच जिल्ह्यात हुलकावणी दिली. दरम्यान, हवामान खात्याच्या अंदाजानुसार ६ जुलैनंतरच जिल्ह्यात पावसाचा जाेर वाढू शकताे.  


जिल्ह्यात जून महिन्यात सरासरीपेक्षा २७ टक्के कमी पाऊस झाला आहे. पूर्वमाेसमी पावसानेही पाठ फिरवल्याने जून महिन्यात पर्जन्यमान कमी झाले आहे. जुलै महिन्यात पाऊस ही सरासरी ओलांडण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार जिल्ह्यात तुरळक ठिकाणी बरसणारा पाऊस ६ जुलैपर्यंत अत्यंत कमी प्रमाणात हजेरी लावेल. त्यानंतर मात्र त्यात वाढ हाेण्याची शक्यता आहे.


जळगाव शहरात दुपारी लावली हजेरी : २९ जून राेजी जिल्ह्यात दांडी मारलेल्या पावसाने ३० जून राेजी काही ठिकाणी तुरळक हजेरी लावली. जळगाव शहरात दुपारी १.३० वाजता जाेरदार पावसाने हजेरी लावली. शहराच्या मध्यवर्ती भागात २० मिनिटे पाऊस झाला.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह