⁠ 
गुरूवार, डिसेंबर 12, 2024
Home | जळगाव जिल्हा | आला रे आला..! मान्सून महाराष्ट्रात दाखल, हवामान खात्याची घोषणा

आला रे आला..! मान्सून महाराष्ट्रात दाखल, हवामान खात्याची घोषणा

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ६ जून २०२४ । राज्यातील शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी आहे. ज्याची आतुरतेने वाटत पाहत असलेल्या मान्सूनची महाराष्ट्रात एंट्री झाली आहे. नैर्ऋत्य मोसमी पावसाचे आज ६ जून रोजी राज्यात आगमन झाले झाल्याची माहिती हवामान खात्याच्या पुणे शाखेचे प्रमुख डॉ. होसाळीकर यांनी ट्विट करून दिली आहे.

नैर्ऋत्य मोसमी पाऊस कोकणातील रत्नागिरी, सोलापूर आणि पुढे मेडक, भद्राचलम विजयनगरम आणि त्यानंतर बंगालच्या खाडीपासून इस्लामपूरपर्यंत पोहोचल्याची माहिती होसाळीकर यांनी दिली आहे.

गेल्या काही दिवसापूर्वी राज्यातील अनेक ठिकाणचे तापमान मोठ्या प्रमाणात वाढल्याने सगळ्यांना मान्सूनची प्रतीक्षा होता. अखेर आज पावसाचे आगमन झाले आहे. राज्यात मान्सूनसाठी पोषक हवामान तयार झाले होते. तसेच मागील तीन ते चार दिवसापासून राज्यात मान्सूनपूर्व पाऊस कोसळत होता.

आज आणि उद्या राज्यात जोरदार पावसाची शक्यता
हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, आज आणि उद्या दक्षिण आणि उत्तर कोकण, मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात जोरदार पावसाची शक्यता आहे. राज्यातील दक्षिण कोकण, उत्तर कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात आज तर, उद्या दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र, उत्तर कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.

जळगाव जिल्ह्यातील वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस
राज्यातील अनेक भागात मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली आहे. गेल्या तीन दिवसापासून जळगाव जिल्ह्यातील विविध ठिकाणी वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी. यामुळे वादळी वाऱ्याने काही ठिकाणी शेतीचं मोठ नुकसान झालं आहे. मोठ्या प्रमाणात आलेल्या वादळी वाऱ्यामुळं आणि पावसामुळं काढणीला आलेल्या केळीच्या बागा उध्वस्त झालेल्या आहेत. तसेच भाजीपाला पिकांचंही नुकसानं झालं आहे. यामुळं शेतकरी चिंतेत आहेत. दरम्यान आजपासून जिल्ह्यात चार दिवस पावसाचा अंदाज वर्तविला आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.