जळगाव लाईव्ह न्यूज । २ ऑक्टोबर २०२५ । गेल्या महिन्यातील राज्यातील अनेक ठिकाणी पावसाने रौद्ररुप धारण केलं आणि अतिवृष्टी झाल्यामुळे शेती पिकांचं अतोनात नुकसान झालं. दरम्यान, ऑक्टोबर महिना सुरु झाल्यापासून नागरिकांना दिलासा मिळाला आहे. सध्या पावसाने विश्रांती घेतली असून आता महाराष्ट्रात मान्सूनच्या परतीच्या पावसाची तारीख हवामान खात्याकडून जाहीर करण्यात आलीय.

8 ऑक्टोबरपासून राज्यातून परतीच्या पावसाला सुरूवात होणार आहे… त्यानंतर पुढच्या काही दिवसातच संपूर्ण राज्यातून मान्सून निघून जाईल.. तर २ ते ७ ऑक्टोबर दरम्यान विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. यादरम्यान प्रामुख्याने मेघगर्जनेसह राहील आणि दुपारनंतर पडेल. वादळी पावसाची सर्वाधिक शक्यता विदर्भात राहील. काढणी केलेली पिके पाऊस आणि वाऱ्यापासून सुरक्षित ठेवावीत, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात येत आहे.

राज्यात 7 ऑक्टोबर 2025 पासून हवामान स्थिर होण्यास सुरुवात होईल, आणि सुमारे 8 ऑक्टोबर 2025 पासून मान्सून राज्यातून निरोप घेईल. त्यानंतर पुढच्या काही दिवसातच संपूर्ण राज्यातून मान्सून निरोप घेईल, अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे.










