शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! 12 दिवस आधीच मान्सून महाराष्ट्रात दाखल

मे 25, 2025 4:03 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ मे २०२५ । उकाड्याने हैराण झालेल्या आणि मान्सूनच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला आहे.यंदा तब्बल 12 दिवस आधीच मान्सून महाराष्ट्रात दाखल झालाय. मान्सून वेळेपूर्वीच दाखल झाल्यानं शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून, आनंदाचं वातावरण आहे.

msn 1

काही दिवसापूर्वी भारतीय हवामान खात्याने मान्सून केरळात २७ मे पर्यंत दाखल होण्याचा अंदाज वर्तविला होता. मात्र केरळात मान्सून २४ मे रोजीच दाखल झाला. त्यांनतर मान्सून महाराष्ट्रात पोहोचण्यासाठी एक ते दोन दिवस जातील, असा अंदाज होता. मात्र मान्सूनसाठी अत्यंत पोषक स्थिती असल्याने अवघ्या काही तासांमध्ये मान्सून राज्यात दाखल झाला. काही वेळात हवामान याबाबतची अधिकृत घोषणा करण्यात आलीय

मान्सून केरळमध्ये शनिवारी दाखल झाला होता, आज महाराष्ट्रात आगमन झाले आहे. त्यानंतर मान्सून महाराष्ट्रात पोहोचण्यासाठी एक ते दोन दिवस जातील, असा अंदाज होता. मात्र मान्सूनसाठी अत्यंत पोषक स्थिती असल्याने अवघ्या काही तासांमध्ये मान्सून राज्यात दाखल झाला.


तब्बल 12 दिवस आधीच मान्सून तळकोकणातील देवगडमध्ये दाखल झाल्याची घोषणा हवामान विभागानं केली आहे. महाराष्ट्रामध्ये साधारण 7 जूनला मान्सून दाखल होतो. मात्र यंदा वेळेच्या आधीच मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांसह शेतकऱ्यांनाही मोठा दिलासा मिळाला. मान्सूनची तीव्रता पाहता पुढील काही तासांमध्ये मान्सून मुंबई आणि पुण्यात दाखल होईल, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. यंदा राज्यात पावसाचं प्रमाण कसं असणार याबाबत आधीच हवामान खात्याकडून अंदाज वर्तवण्यात आला होता. यंदा देशासह राज्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. यंदा देशात मान्सूनच्या पावसाचं प्रमाण 107  टक्क्यांच्या आसपास राहू शकतं अशी शक्यता आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment