जळगाव रेल्वे स्थानकावर दोन दहशतवादी बॉम्बसह जेरबंद, प्रवाशांमध्ये खळबळ, पण..

ऑगस्ट 14, 2025 6:13 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ ऑगस्ट २०२५ । जळगाव रेल्वे स्थानकावर दोन दहशतवादी बॉम्बसह असल्याची माहिती मिळताच RPF, जीआरपीसह पोलिस रेल्वेस्थानकात दाखल झाल्यामुळे रेल्वेस्थानकावर छावणीचे स्वरूप आले होते. पण हे पाहून प्रवाशांचीही धांदल उडाली होती. मात्र, हे सर्व मॉकड्रील असल्याचे माहिती झाल्यावर प्रवाशांनी सुटकेचा निःश्वास सोडला. येत्या १५ ऑगस्ट, भारत-पाकिस्तानमधील वाढता तणाव आणि पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आज गुरूवारी १४ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजता जळगाव रेल्वे स्थानकावर बॉम्ब हल्ल्याचं मॉक ड्रिल घेण्यात आलं.

mockdril

प्लॅटफॉर्म क्रमांक ४ वरील गर्दीच्या ठिकाणी झालेल्या या मॉक ड्रिलमध्ये, बॉम्बसह दोन दहशतवाद्यांना पथकाने मोठ्या शिताफीने अटक केली. या सरावासाठी जिल्हा पोलीस दल, छत्रपती संभाजीनगर लोहमार्ग पोलीस, रेल्वे प्रोटेक्शन फोर्स (RPF) आणि भुसावळ जीआरपी पथक यांच्या संयुक्त विद्यमाने ही मोहीम राबवण्यात आली, अशी माहिती भुसावळ जीआरपीचे पोलीस निरीक्षक सुधीर धायेरकर यांनी दिली.

रेल्वे पोलिसांनी यावेळी खबरदारी म्हणून शहर पोलीस पथक, बॉम्ब शोधक आणि नाशक पथक, रेल्वे पोलीस पथक, शीघ्र कृती दल (QRT) आणि श्वान पथकाला पाचारण केलं होतं. संभाव्य दहशतवादी हल्ल्याला तोंड देण्यासाठी आणि प्रवाशांच्या सुरक्षेची खात्री करण्यासाठी हे मॉक ड्रिल महत्त्वाचं ठरलं.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now