पादचाऱ्यांचे मोबाईल लांबविणारे अट्टल चोरटे जाळ्यात

सप्टेंबर 10, 2021 9:22 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १० सप्टेंबर २०२१ । शहरात पायी फिरणाऱ्या नागरिकांचे मोबाईल लंपास करणाऱ्या दोघांच्या मुसक्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आवळल्या आहे. त्यांच्या ताब्यातून चोरीचे दोन मोबाईल हस्तगत करण्यात आले असून अक्षय उर्फ मॉडल उर्फ टकोरा मुकेश अटवाल व अक्षय आनंदा जावळे (दोघे रा.गुरुनानक नगर शनीपेठ जळगाव) अशी दोघांची नावे आहेत.

mobile thieves arrested jalgaon

शहरातील मोबाईल चोरीच्या वाढत्या घटना लक्षात घेता एलसीबीचे निरीक्षक किरणकुमार बकाले यांनी पथक नेमले होते. पथकातील सहायक फौजदार विजय पाटील, युनूस शेख, हे.कॉ. जयंत चौधरी, संदीप साळवे, पोलिस नाईक विजय शामराव पाटील, किरण धनगर, प्रमोद लाडवंजारी, अविनाश देवरे, पो.कॉ. पंकज शिंदे, चालक मुरलीधर बारी यांनी गुप्त माहिती काढून दोघांना अटक केली.

अटकेतील दोघांनी त्यांचा अजून एक साथीदार रोहीत उर्फ रोहन पंडीत निदाने (शनीपेठ जळगाव) याच्या मदतीने एक मोबाईल जळगाव शहरातील पांडे चौकातून व दुसरा रिंग रोड परिसरातील पायी चालणा-या इसमाच्या हातातून हिसकावला असल्याची कबुली दिली आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस स्टेशनला गुन्ह्याची नोंद झालेली आहे. जिल्हापेठ पोलिस स्टेशनला दाखल दोन्ही गुन्ह्यांची उकल झाली असून दोघा चोरट्यांना पुढील तपासकामी जिल्हापेठ पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now