जळगाव लाईव्ह न्यूज । १० फेब्रुवारी २०२२ । चोरट्यांनी वेगवेगळ्या माध्यमातून चोरी करण्याचे प्रकार काढले असून काही दिवसांपूर्वी अजिंठा चौफुली परिसरातील एका हॉटेलमधून १३ हजार रुपये किमतीचा मोबाइल चोरीस गेला होता. याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने एका संशयितास बुधवारी अटक केली.

गोविंदा आधार पवार (वय ३१, रा. पहूर पेठ, ता. जामनेर) असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे. गोविंदा याने साथीदाराच्या मदतीने हॉटेल जमजम येथे जेवणाच्या पार्सलची ऑर्डर दिली. याचदरम्यान व्यवस्थापकाची नजर चुकवून मोबाइल चोरला होता. हा मोबाइल तो स्वत: वापरत असल्याचे तांत्रिक तपासातून उघड झाले असून पवारला अटक केली आहे.

हे देखील वाचा:
- जळगाव जिल्ह्यात ३१ जुलैपर्यंत पावसाचा ‘येलो अलर्ट’; हवामान खात्याचा इशारा
- रोटरॅक्ट डिस्ट्रिक्ट ३०३० च्या ‘योगपर्व २०२६’ स्थापना समारंभ
- जळगाव जिल्ह्यात वाळूमाफियांवर पोलिसांची मोठी कारवाई; ८८ लाखांचा मुद्देमाल जप्त, २१ जणांवर गुन्हे दाखल
- LPG सिलिंडर ते बँकिंग..! १ ऑगस्टपासून अनेक महत्त्वाचे नियम बदलणार ; खिशावर होणार थेट परिणाम
- रेल्वेच्या तत्काळ तिकीट बुकिंगच्या नियमांत १ ऑगस्टपासून मोठा बदल; काय आहे घ्या जाणून..











