कृषी विद्यालयाच्या तीन विद्यार्थ्यांचे मोबाईल लंपास
जळगाव लाईव्ह न्यूज । २३ ऑगस्ट २०२२ । मुक्ताईनगर येथील कृषी महाविद्यालयात शिक्षणासाठी आलेल्या तीन विद्यार्थ्यांचे खोलीतून अज्ञात भामट्याने 15 हजार रुपये किंमतीचे मोबाईल चोरून नेले. शनिवार, 20 रोजी रात्री 11.30 ते रविवार, 21 ऑगस्ट रोजी रात्री उशिरा ही घटना घडली. याबाबत पोलिसांत अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नरेंद्र संजय सोनवणे (22, शिवगंगा नगर, सोलापूर) हे त्यांच्या अन्य दोन मित्रांसह कृषी महाविद्यालयात शिक्षण घेत आहेत. मुक्ताईनगर शहरातील गजानन महाराज मंदिरामागे या विद्यार्थ्यांनी खोली (रूम) केली असून तिघे खोलीत झोपले असताना त्यांनी आपापले मोबाईल चार्जिंगला लावले असता चोरट्यांनी संधी साधून ते लांबवले. सोमवारी सकाळी चोरीचा प्रकार उघडकीस आल्यानंतर अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास नाईक विनोद सोनवणे करीत आहेत.