⁠ 
मंगळवार, मे 21, 2024

दूध संघाची फसवणूक : परवानगी न घेता विकले १८०० किलो तूप, दोघांविरुद्ध गुन्हा

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० ऑगस्ट २०२२ । जळगाव दुध संघातील राजकीय वातावरण तापलेले असतांना दुसरीकडे एक मोठी बातमी समोर आली आहे. प्रशासक समितीची पूर्व परवानगी न घेता कमी किंमतीत तब्बल १८०० किलो तूप विकून १ लाख ५३ हजारांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी एकाविरुद्ध गुन्हा दाखल झाल्यामुळे खळबळ उडाली आहे.

शैलेश सुरेश मोरखडे (वय ४५, धंदा – नोकरी दुध विकास फेडरेशन ,जळगाव) यांनी निखील सुरेश नेहते रा. दादावाडी खोटे नगर, जळगाव सोबत इतर कर्मचारी (नाव व पत्ता माहित नाही) विरुद्ध फिर्याद दिली आहे. फिर्यादीत म्हटले आहे की, दि. १ ते २३ ऑगस्ट २०२२ च्या दरम्यान निखील सुरेश नेहते व त्याच्या सोबत असलेले कर्मचारी यांनी जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्यादीत जळगाव यांच्या मालकीचे १८०० किलो तूप हे ८५ रुपये दराने प्रशासक समितीची पूर्व परवानगी न घेता विठठल रुख्मीनी एजन्सीला १ लाख ५३ हजार रुपयात अर्थात कमी किंमतीत विक्री करुन जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्यादीतचे प्रशासक समितीची फसवणूक केली.

यामुळे जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे अदांजे २ लाख ७ हजारपेक्षा अधीक रुपयांचे आर्थिक नुकसान केले आहे. याप्रकरणी निखील सुरेश नेहतेसह इतर कर्मचारींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सपोनि सदिप परदेशी हे करीत आहेत.