⁠ 
मंगळवार, सप्टेंबर 17, 2024
Home | जळगाव जिल्हा | रावेर | सावद्यात ताई फाउंडेशनच्या वतीने गरजूंना मोबाईल वाटप!

सावद्यात ताई फाउंडेशनच्या वतीने गरजूंना मोबाईल वाटप!

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Sawada News-जळगाव लाईव्ह न्यूज । दिपक श्रावगे । महिलांनी बचत गटात सहभागी व्हावे व शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन आत्मनिर्भर व्हावे असे प्रतिपादन हरेश्वर भोई (जिल्हा व्यवस्थापक उमेद अभियान, जळगाव) यांनी केले. सावदा येथे ताई फाउंडेशनच्या वतीने दि. 24 रोजी सकाळी 12 वाजेदरम्यान नपाच्या कोचुर रोडवरील डॉ.बाबासाहेब आंबेडकर सभागृहाचे आवारात गरीब, गरजू व दिव्यांग बांधवाना मोबाईल वाटपाच्या कार्यक्रम घेण्यात आला, त्यावेळी अध्यक्षीय भाषणातून ते बोलत होते.

तसेच प्रमुख पाहुणे समाधान रतन पाटील (जिल्हा संसाधन व्यक्ती, पंतप्रधमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग, जळगाव) यांनी पंतप्रधमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग याविषयी माहिती देत मार्गदर्शन केले. भुसावळ तालुक्यातील कंडारी येथील जयश्री तायडे (शेळीच्या दुधा पासून साबण निर्मिती करणाऱ्या महिला उद्योजक) यांनी आपले अनुभव सांगितले. मुक्ताईनगर येथील आदर्श शिक्षक विश्वनाथ महाजन यांनी महिलांनी चूल व मूल सांभाळत असतांना आता आत्मनिर्भर व्हावे व स्वतःचे पायावर उभे राहणे आवश्यक असल्याचे संगितले. पत्रकार प्रवीण पाटील, भानुदास भारंबे यांनी देखील यावेळी मनोगत व्यक्त केले.

प्रास्ताविकात ताई फाउंडेशनचे अध्यक्ष दिपक सपकाळे यांनी बोलतांना फाउंडेशनच्या माध्यमातून गरीब, गरजू, विधवा व दिव्यांग यांची सेवा करताना समाधान लाभते यात कोणताही हेतू न बाळगता निस्पृह कार्य करणे हाच संस्थेचा उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी विश्वनाथ महाजन, विकी भंगाळे, पत्रकार शाम पाटील, लाला कोष्टी, प्रवीण पाटील, भानुदास भारंबे, दिपक श्रावगे, कैलास लवंगडे आदी उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांचे हस्ते गरीब, विधवा, गरजू महिलांना १०० मोबाईल वाटप करण्यात आले, यावेळी आशिष जोशी, साई सपकाळे, संतोष बेदरकर, महेश बेदरकर, जितेंद्र बाविस्कर, सतीश पाटील, सागर चौधरी, कृष्णा संगेले, करिश्मा संगेले आदी ताई फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह