⁠ 
शनिवार, मे 18, 2024

अमळनेरातील खाजगी व शासकीय रुग्णालयात भेट देऊन आमदारांनी घेतला आढावा

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कोरोना प्रादुर्भावामुळे शहरातील सर्व खाजगी आणि शासकीय रुग्णालये ओव्हरलोड झाले असताना प्रत्यक्ष आखोदेखी स्थिती जाणून घेण्यासाठी आमदार अनिल पाटील यांनी सर्व खाजगी व शासकीय रुग्णालयात भेट देऊन सद्यस्थितीचा आढावा घेतला.

यावेळी अनेक दवाखान्यातील भयावह स्थितीचे चित्र पाहून आमदारांना देखील गहिवरून आले मात्र आमदारांनी सामाजिक अंतर कायम ठेवून अनेक रुग्णांची आस्थेवाईकपणे चौकशी करून त्यांना धीर दिला आणि एक सकारात्मक ऊर्जा देखील त्यांच्यात निर्माण केली. यामुळे आमदारांच्या सदर भेटीप्रसंगी रुग्ण आणि त्यांच्या नातलगांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले होते. प्रारंभी आमदारांनी अमळनेर ग्रामीण रुग्णालयातील कोविड हेल्थ सेंटर आणि इंदिरा भुवनातील कोविड सेंटरमध्ये भेट दिली यावेळी त्यांच्या सोबत ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ प्रकाश ताडे,वैद्यकीय अधिकारी डॉ आशिष पाटील व स्टाफ उपस्थित होत.

यावेळी आमदारांनी ऑक्सिजन व इतर बेडसची स्थिती,ऑक्सिजन उपलब्धता, रेमीडिसिव्हर व इतर अत्यावश्यक औषधींची उपलब्धता यासह इतर सोई सुविधांची माहिती जाणून घेतली,याशिवाय रुग्ण आणि त्यांच्या नातलगांशी देखील चर्चा करून त्यांना धीर दिला.कोणत्याही गोष्टींची उणीव भासल्यास संपर्क करण्याच्या सूचना आमदारांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिल्यात,सोबतच संपूर्ण आरोग्य टीम अहोरात्र सेवा देत असल्याने त्यांचे कौतुक देखील आमदारांनी केले.

यानंतर आमदारांनी डॉ संदीप जोशी व डॉ अनिल शिंदे यांचे नर्मदा मेडिकल फाऊंडेशन,डॉ किरण बडगुजर यांचे श्री दत्त हॉस्पिटल, डॉ निखिल बहुगुणे यांचे हॉस्पिटल,यासह इतर खाजगी रुग्णालयाना भेटी दिल्या.यावेळी संबधित डॉक्टर आणि स्टाफ कडून सद्यस्थिती त्यांनी जाणून घेतली.रुग्ण आणि त्यांच्या नातलगांशी देखील चर्चा करून सर्वाना आमदारांनी धीर दिला.संबंधित हॉस्पिटल च्या मेडिकल मधील रेमीडिसिव्हर इंजेक्शनचा देखील आमदारांनी आढावा घेतला.आमदारांच्या सदर भेटीमुळे रुग्ण व नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

रेमीडिसिव्हर उपलब्धतेसाठी पालकमंत्रीशी चर्चा

अमळनेरात रेमीडिसिव्हर इंजेक्शन चा तुटवडा भासत असल्याने आमदारांनी हा विषय गंभीर्याने घेऊन जिल्ह्याचे पालकमंत्री ना गुलाबराव पाटील व जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याशी संपर्क साधून खंत व्यक्त केली,त्यांनी लवकरच हे इंजेक्शन अमळनेरात उपलब्ध होतील अशी ग्वाही दिली,यामुळे दुसऱ्याच दिवशी अमळनेर ग्रामीण रुग्णालयात काही रेमीडिसिव्हर इंजेक्शन उपलब्ध झालीत,व रुग्णांना ती दिली देखील गेलीत,एक दोन दिवसात अजून काही इंजेक्शन उपलब्ध होणार आहे, याशिवाय आमदारांनी आपल्या स्तरावर काही कंपन्यांशी संपर्क साधून खाजगी मेडिकल वर रेमीडिसिव्हर इंजेक्शन उपलब्ध करून दिली असून अजून काही इंजेक्शन उपलब्ध करण्याचा प्रयत्न ते करीत असल्याचे आमदारांनी सांगितले.

आमदारांच्या भेटीने नातेवाईक झाले भावनिक

एवढ्या प्रचंड भयावह परिस्थितीत देखील आमचे आमदार प्रत्यक्षात रुग्णालयात येऊन रुग्णाची भेट घेतात. आम्हाला धीर देतात हे आमच्यासाठी खूप असून त्यांच्या या भेटीने आमच्या पाठीशी कुणितरी ठाम उभे असल्याची भावना आमच्यात निर्माण झाली आहे,खरोखरच गेल्या वर्षभरापासून कोरोना महामारीत आमच्या आमदारांनी केलेले कार्य कौतुकास्पद असल्याची भावना रुग्णांच्या नातलगांनी यावेळी व्यक्त केली.

कृपा करा आणि घरीच सुरक्षित

जनतेला आवाहन करताना आ पाटील म्हणाले की सर्व रुग्णालयात भयावह परिस्थिती मी जवळून पहिली,हॉस्पिटलमध्ये जाताच पार्किंग काय,व्हरांड्यात काय, वेटिंग रूम काय? जिथे जागा दिसेल तिथे रुग्ण ऍडमिट आहे,एवढे रुग्ण उपचार घेत असूनही दररोजचे अनेक जण दगावत आहेत,हे सर्व चित्र पाहत नागरिकांना माझी विनंती आहे की कोरोना सहज घेऊ नका, शासन व प्रशासन जे काहो निर्देश देत असेल ते सर्व नियम काटेकोरपणे पाळा, दुसऱ्याच्या घरात दुःख झाले असेल ते आपलेच आहे असे समजून परिवार सुरक्षित ठेवण्यासाठी आपणही घरातच राहा,खोट वाटत असेल तर प्रत्यक्ष स्थितीची माहिती व्हिडीओ चित्रकरण द्वारे मागवून घ्या,सर्व शासकीय आणि सरकारी रुग्णालयातील डॉक्टर आणि स्टाफ चे कार्य खरोखरच कौतुकास्पद आहे,आहे त्या सामुग्रीवर आणि सोई सुविधांवर जास्तीतजास्त रुग्णांना वाचविण्याचा प्रयत्न ते करून जीवदान देत आहेत आपला परिवार विसरून दररोज 13 ते 14 तास ते काम करीत असल्याने मंदिरात नव्हे तर त्यांच्यातच आता देव दिसू लागला आहे,यामुळे जनतेने देखील डॉक्टर व त्यांच्या टीमलाच देव संबोधून त्यांच्याशी अरेरावी न करता सर्वतोपरी सहकार्य करावे यामुळे नक्कीच आपल्या रुग्णास योग्य उपचार मिळतील असे आवाहन आमदार पाटील यांनी केले आहे.