जळगाव लाईव्ह न्यूज । ७ मार्च २०२५ । जळगाव शहरातील आकाशवाणी चौक आणि शिव कॉलनी स्टॉप येथे मागे 24 तासात झालेल्या भीषण अपघातांच्या पार्श्वभूमीवर आमदार सुरेश भोळे यांनी आज तातडीची बैठक घेतली. या बैठकीत आमदार भोळे यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच झापले आणि उपाययोजना तातडीने राबवण्याचे निर्देश दिले.

या बैठकीत बांभोरी पूल ते टीव्ही टॉवर दरम्यान ठिकठिकाणी स्पीड ब्रेकर लावण्याचे आदेश देण्यात आले. तसेच विना परवानगी बॅनर लावण्यास बंदी, महापालिकेला कठोर कारवाईचे निर्देश देण्यात आले. एवढेच नव्हे तर “माझेही बेकायदा बॅनर लावले असतील तर काढा,” असेही त्यांनी स्पष्ट सांगितले. “लोक मेल्यावरच बैठका घ्यायच्या का?” असा प्रश्न उपस्थित करत भोळे यांनी अधिकाऱ्यांना जबाबदारीचे भान ठेवण्याचा इशारा दिला. तसेच आकाशवाणी आणि अजिंठा चौफुली वरील सर्कल तातडीने दुरुस्त करण्याचे निर्देश दिलेत.