VIDEO : आमदार निवासात शिळा, निकृष्ट दर्जाच जेवण ; शिंदेंच्या आमदारांनी कॅन्टीनवाल्याला चोपलं

जुलै 9, 2025 11:45 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ जुलै २०२५ । सध्या सोशल मीडियावर बुलढाण्याचे शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यात आकाशवाणी आमदार निवासातील कॅन्टीनमध्ये शिळा भात आणि वास येणारी डाळ दिल्याने संजय गायकवाड संतापले. निकृष्ट दर्जाच जेवण दिलं म्हणून त्यांनी कॅन्टीन कर्मचाऱ्याला मारहाण केली. या मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे

sanjay gaikwad

मिळालेल्या माहितीनुसार, काल (मंगळवारी,ता 8) रात्री मुंबई स्थित आमदार निवासातील कॅन्टीनमध्ये आमदार संजय गायकवाड यांनी जेवणाची ऑर्डर दिली. त्यांना ऑर्डर प्रमाणे रूममध्ये जेवणही पुरवण्यात आलं. मात्र जेवणात देण्यात आलेलं वरण आणि भात हे शिळ होतं व त्याचा वास येत होता असा आरोप करत आमदार संजय गायकवाड यांनी केला.

त्यानंतर गायकवाड यांनी थेट आमदार निवासातील कॅन्टीन ऑपरेटरला याबाबत विचारणा केली, त्याचबरोबर यावेळी त्यांनी कोणीही बील देऊ नका असंही सांगितलं, त्याचबरोबर बील काऊंंटरवरती बसलेल्या ऑपरेटरच्या कानशिलात देखील लगावली. यावेळी कॅन्टीन कर्मचाऱ्याला चांगलाच चोप दिला.

या सगळ्या वादावर आपली भूमिका मांडताना संजय गायकवाड म्हणाले की, “इथे साडेपाच वर्ष मी मुंबईला येतोय. मी सहसा कधी बाहेर जेवायला जात नाही. मी रात्री 9.30 वाजता डाळ, वरण, भात, चपातीची ऑर्डर दिली. पहिला घास खाल्ल्यावर मला खूप घाणेरडं वाटलं” “दुसरा घास खाल्ल्यावर उलटी झाली. वरणाला खूप भयंकर वास येत होता. पॉयजन सारखा हा प्रकार होता. भात शिळा होता. याआधी तीन वेळा असं जेवण आल्यानंतर मी मालकाला समज दिली. निकृष्ट जेवण घेऊन पार्सल घेऊन गाडीत बसतो. सकाळी गावी पोहोचल्यावर खूप अस्वस्थ वाटतं” असं आमदार संजय गायकवाड म्हणाले.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now