जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव शहरातील मेहरूण मधील प्रभाग क्रमांक १५ मधील संत ज्ञानेश्वर चौक, राम मंदिर चौक, जय जवान चौक, पीरजादा वाडा, आझाद चौक, मिल्लत नगर, मलिक नगर भागातील, रस्त्यांचे कॉंक्रिटीकरण करणे आमदार राजू मामा भोळे यांच्या माध्यमातून दोन कोटी रुपये मंजूर झाल्याने या रस्त्याचे भूमिपूजन संपन्न झाले. या महत्त्वाच्या क्षणी आमदार राजू मामा भोळे यांच्या हस्ते हा सोहळा पार पडला, ज्यामध्ये ग्रामस्थ, स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होते.

आमदार राजु मामा यांचे कार्य समाजातील सर्व स्तरांपर्यंत पोहोचत आहे. गावाचा विकास व गरजा ओळखून त्या पूर्ण करण्यासाठी त्यांनी वेळोवेळी दाखवलेला तत्पर प्रतिसाद याचेच द्योतक आहे. या भूमिपूजनाने अपेक्षांना नवी दिशा मिळाली असून, मेहरूण गावाच्या विकासाच्या दृष्टीने एक मोठे पाऊल उचलले गेले आहे. असे प्रतिपादन प्रभागाचे मा.नगरसेवक प्रशांत भाऊ नाईक यांनी केले.

यांची होती उपस्थिती?
यावेळी कल्लू खाटीक, अल्ताफ शेख, वसीम बापु, इसा बेपारी, नदीम दादा, अनिश शेख, कल्लू पैलवान, सुतार भाई, अकिल खान, पेंटर ,इक्बाल पिरजादे, नारायण महाजन महारू सांगळे राजेंद्र पाटील, ईश्वर सोनवणे मगबुल तडवी, मुस्तफा मिर्झा, फिरोज खान, लुकमान शेख, इम्रान बागवान, इरफान बागवान बल्ली भाई, अफसर खाटीक, मुकेश घुगे संजय पाटील, हेमंत नाईक, बंडू वाणी, सुनील सरोदेष विजय वानखेडे, प्रदीप रोटे, भूषण लाडवंजारी, ईश्वर अण्णा पाटील, राकेश लाड, भैय्या वाघ,राजू पाटील, एकनाथ वाघ, मिलिंद आंधळे, प्रतीक नाईक,आबा ढाकणे,देवेंद्र नाईक योगेश नाईक,आबा ढाकणे इम्रान बागवान वर्गातील सर्व ग्रामस्थ ग्रामस्थ मंडळी उपस्थित होती. मान्यवर उपस्थित होते..












