Muktainagar News-जळगाव लाईव्ह न्यूज । सुभाष धाडे । शासनाच्या निकषाप्रमाणे गुरांसाठी गोठ्याणे बांधकाम पुर्ण केलेल्या पात्र लाभार्थ्यांचे रखडलेले अनुदान लवकरच मिळणार असल्याचे आश्र्वासन मुक्ताईनगर मतदार संघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी दिले.
तालुक्यातील सुकळी येथील शेतकरी तथा पशुपालक यांनी शासनाने ठरवुन दिलेल्या निकषाप्रमाणे गोठा बांधकाम पुर्ण केलेले आहे. सदर बांधकाम पुर्ण करुन वर्ष लोटले तरी अद्यापपर्यंत लाभार्थ्यांना अनुदान रक्कम मिळाली नाही. मध्यंतरी आलेल्या विविध अडचणी तसेच अंतुर्ली येथील बोगस गोठा बांधकामात गैरव्यवहार झाल्याप्रकरणी प्रहारच्या कार्यकर्त्यांनी गटविकास अधिकारी यांचेकडे दिलेल्या तक्रारीमुळे पंचायत प्रशासनाकडुन, संपुर्ण तालुक्यात गोठा बांधकामबाबत प्रत्यक्ष पाहणी करून चौकशीचे सोपस्कार नुकतेच पार पडले.
दरम्यान, सुकळी येथील अनुदानाच्या प्रतिक्षेत असलेले पात्र लाभार्थी यांनी दि. २१ रोजी आमदार चंद्रकांत पाटील यांची भेट घेऊन आमदार यांना लेखी निवेदनाद्वारे व्यथा मांडल्या. यावेळी आमदार पाटील यांनी जिल्हा परीषेदेचे मुख्याधिकारी आशिया यांच्याशी तात्काळ संपर्क साधुन अनुदानाच्या प्रतिक्षेत असणाऱ्या पात्र लाभार्थ्यांना शासकिय अनुदान त्वरीत मिळण्यात यावं याविषयी योग्य त्या सुचना केल्या. या प्रसंगी बाजीराव सोनवणे, नितीन पाटील, कल्पेश पाटील, भैय्या पाटील, वासुदेव कोळी, गजानन पाटील, डोलारखेडा येथील राजेंद्र भोई,अमोल कोळी आदी उपस्थित होते.