Big Breaking : आमदार रडारवर, ४० जणांचे पथक जळगावात!

जून 17, 2021 10:14 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ जून २०२१ | बीएचआर प्रकरणात पुण्याच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी सायंकाळपासून जळगाव शहरात ठिय्या मांडून होते. गुरुवारी सकाळपासून पथकाने जळगाव, जामनेर, औरंगाबाद, अकोला, पुणे, मुंबई या ठिकाणाहून धरपकड सुरू करून १२ जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. जामनेर येथील आमदारांचे निकटवर्तीय दोघांना देखील पथकाने ताब्यात घेतले आहे.

new project (2)

बीएचआर प्रकरणात जिल्ह्यातील एक आमदार देखील आर्थिक गुन्हे शाखेच्या रडारवर असून त्यांच्या अटकेची अफवा जिल्हाभरपसरली आहे. बुधवारी सायंकाळी आर्थिक शाखेचे पथक विविध वाहनांनी जळगावात दाखल झाले. गुरुवारी सकाळी आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने धरपकड सुरू केली. जामनेर येथून आमदार निकटवर्तीय असलेल्या पाटील आणि झाल्टे नामक व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले आहे. जळगाव शहरातून हॉटेल व्यावसायिक, सोन्याचे व्यापारी, उद्योजक, पाळधी येथील एकाला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. भंगाळे, तोतला, लोढा, मणियार परिवारातील सदस्यांना ताब्यात घेतले असून चौकशी पथकाने याबाबत २ तासाने सविस्तर माहिती देणार असल्याचे जळगाव लाईव्ह न्यूजशी बोलताना सांगितले.

पथकाने जळगाव शहरातून भागवत भंगाळे , पाळधी येथुन जयश्री मणियार, संजय तोतला तर भुसावळ येथील राजकीय पदाधिकारी आसिफ मुन्ना तेली , जामनेर येथील जितेंद्र रमेश पाटील, छगन शामराव झाल्टे, राजेश शांतीलाल लोढा, प्रितेश चंपालाल जैन (धुळे), अंबादास आबजी मानकापे (औरंगाबाद), जयश्री अंतिम तोतला (मुंबई), प्रेम नारायण कोगटा (जळगाव, यांस पुणे येथील रिट्झ कार्लटन या हॉटेल मधून ताब्यात घेण्यात आले), प्रमोद किसनराव कापसे (अकोला) या बारा जणांना अटक केली आहे. पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने एकाचवेळी सर्व जणांना ताब्यात घेतले. पुणे आर्थिक गुन्हे शाखेचे उपायुक्त भाग्यश्री नवटके यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाची कारवाई सुरू आहे.

हे देखील वाचा :
Big Breaking : जळगावातील दिग्गज पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात

आमदार पोहचले जिल्हापेठ पोलिसात

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now