⁠ 
गुरूवार, नोव्हेंबर 21, 2024
Home | जळगाव जिल्हा | एकनाथ खडसेंकडे बघायची स्थिती राहिलेली नाही; आ.चंद्रकांत पाटीलांची टीका काय?

एकनाथ खडसेंकडे बघायची स्थिती राहिलेली नाही; आ.चंद्रकांत पाटीलांची टीका काय?

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ सप्टेंबर २०२४ । शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा एकदा एकनाथ खडसेंवर जोरदार हल्ला चढवला. खडसेंमुळे राजकारणाचा स्तर घसरल्याची टीका चंद्रकांत पाटील यांनी केली. खडसे यांच्याकडे शिल्लक राहिलंय काय? असा चिमटाही त्यांनी यावेळी काढला.खडसेंचा माझ्यासाठी विषय संपलेला आहे. निवडणुका समोर आहे, येऊ द्या मी त्यांना उत्तर देईल, असे ते म्हणाले.

महिला भगिनी संदर्भात खडसे मागे काय बोलले -अंजली दमानिया संदर्भात महाराष्ट्राला माहिती आहे. त्यांच्या घरातही महिला भगिनी आहेत. महाराष्ट्रात अत्यंत खालच्या पातळीवर घाणेरडा -बोलणारा पातळी असेल तर ते खडसे आहेत, असा आरोप करत कीचड़ में में पत्थर मारने से क्या फायदा असा टोला त्यांनी लगावला.

राजाच्या घरात राजा जन्माला यायला नको. घराणेशाही कमी झाली पाहिजे. काही लोक घराणेशाही पुढे आणताय अशी टीका त्यांनी रोहिणी खडसे आणि एकनाथ खडसे यांच्यावर अप्रत्यक्षपणे केला. मात्र सध्या घराणेशाही काहीच कामाची राहिलेली नाही. रूपालीताई चाकणकर जे बोलल्या त्यांच्या वक्तव्याचा मला आधार असल्याचे पाटील म्हणाले.

मी एकनाथ खडसे यांच्याकडे बघतच नाही. आता त्यांचं शिल्लक राहिलं काय? त्यांच्याकडे बघायची स्थिती राहिलेली नाही. खडसे म्हणतायेत राजकारणाचा स्तर घसरत चालला आहे. मला खडसेंना सांगायचं आहे की खडसेंमुळेच राजकारणाचा स्तर खाली घसरला आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.