⁠ 
शनिवार, मे 18, 2024

एरंडोल येथे ‘महाराष्ट्र बंद’ला समिश्र प्रतिसाद

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ ऑक्टोबर २०२१ । उत्तर प्रदेशातील लखीमपूर खिरी येथे झालेल्या घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीतर्फे पुकारण्यात आलेल्या ‘महाराष्ट्र बंद’ला एरंडोल येथे संमिश्र प्रतिसाद मिळाला.

सोमवार दि.११ रोजी महाविकास आघाडीतर्फे शेतकरी विरोधी केंद्र सरकारच्या निषेधार्थ महाराष्ट्र बंदचे आवाहन करण्यात आले होते. लखमीपुर खिरी सीमेवरील आंदोलक शेतकऱ्यांनी हरियाणाचे मुख्यमंत्री व केंद्रिय राज्यमंत्री यांच्या गाड्यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न केला होता व त्या रागाच्या भरात केंद्रिय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांच्या मुलाच्या ताफ्यात असलेल्या गाडीने चार शेतकऱ्यांना गाडीखाली चिरडले. त्यासाठी केंद्र सरकारचा निषेध करुन दोषींवर गुन्हा दाखल करण्याची व आरोपीच्या अटकेची मागणी करण्यासाठी तसेच मृत शेतकऱ्यांना भावपुर्ण श्रद्धांजली वाहून शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी सर्व राजकीय पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी, शेतकरी संघटना, विविध संघटनांनी महविकास आघाडीच्या या आंदोलनाला पाठिंबा दर्शविला होता. शहरातील दुकाने सकाळी पूर्णपणे बंद होते. दुपारनंतर संपुर्ण मेन रोड, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा फुले शॉपिंग कॉम्प्लेक्स, छत्रपती शिवाजी महाराज कॉम्प्लेक्स आदी ठिकाणी दुकाने सुरू करण्यात आली होती.