---Advertisement---
जळगाव शहर शैक्षणिक

मिशन अँडमिशन : नूतन मराठा महाविद्यालयात अकरावीच्या विज्ञान शाखेचे प्रवेश ओव्हरफ्लो

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । गौरी बारी । कोरोनाचे सावट काहीसे दूर झाल्यानंतर चालू शैक्षणिक वर्षासाठी प्रवेशप्रक्रियेला सुरवात झालेली आहे. शहरातील नूतन मराठा महाविद्यालयात कला, विज्ञान, वाणिज्य शाखेसाठी विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. महाविद्यालय पुन्हा गजबजले असल्याने महाविद्यालयाला नवसंजीवनी मिळाली आहे.

mission admission nutan maratha college 2021 11th sci jpg webp

अकरावी व पदवी शिक्षणासाठी अनेक उत्तीर्ण विद्यार्थी आपापला प्रवेश ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने पूर्ण करताना दिसत आहेत. शहरातील नूतन मराठा महाविद्यालय इथे देखील विद्यार्थी आपला प्रवेश निश्चित करताना दिसून आलेत.

---Advertisement---

कोरोनाच्या महामारीमुळे सर्वत्र दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना मूल्यमापन पद्धतीने गुण देण्यात आलेत. परंतु आता कोरोना निर्बंध कमी झाल्यामुळे विद्यार्थी महाविद्यालयात जाऊन आपला प्रवेश निश्चित करून घेऊ शकतात. विद्यार्थी मिळालेल्या गुणांच्या आधारावर हव्या त्या शाखेत प्रवेश घेऊ शकतात.

नूतन मराठा महाविद्यालयात अकरावी कला शाखेत ८४० जागा असूनआजपर्यंत २५८ विद्यार्थ्यांनी, वाणिज्य शाखेत ४८० जागा असून २५७ विद्यार्थ्यांनी तर विज्ञान शाखेत ४८० जागा असून ४८० विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे.

तसेच बारावी कला शाखेत ४८० जागा असूनआजपर्यंत ३३१ विद्यार्थ्यांनी, वाणिज्य शाखेत ४८० जागा असून ३६८ विद्यार्थ्यांनी तर विज्ञान शाखेत ३६० जागा असून ४४२ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. विज्ञान शाखेत अकरावीचे संपूर्ण विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून. विज्ञान शाखेच्या राखीव जागे पेक्षा जास्त प्रवेश नोंदविण्यात आला आहे.

तसेच FY. BA (कला) शाखेच्या ९२० जागा असून आजपर्यंत ३०१ विद्यार्थ्यांनी, FY. B.com (वाणिज्य) ४२० जागा असून २६१ तर विज्ञान शाखेत ४२० जागा असून ९० विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे.

ऑनलाईन घेऊ शकता प्रवेश

नूतन मराठा महाविद्यालयाच्या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन प्रवेश निश्चित करून नंतर महाविद्यालयात आवश्यक ते कागदपत्र जोडून व प्रवेश फीचे चलन भरून महाविद्यालयात जमा करून आपला प्रवेश निश्चित करून घ्यावा. या बद्दलची संपूर्ण माहिती प्रवेश प्रक्रिया प्रमुख डॉ. एन.जे.पाटील यांनी दिली.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---