जळगाव लाईव्ह न्यूज । १० जुलै २०२२ । महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी नुकत्याच झालेल्या आपल्या नागपूर येथील मेळाव्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्यावर कराडून टीका केली होती. यावेळी ते नागपूरला लागलेले ‘कलंक’ आहेत अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली होती.(fadanvis is kalank said uddhav thakre)

उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेला आता भाजपातर्फे प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे. सर्व स्तरांवरून भारतीय जनता पक्षाचे नेते व कार्यकर्ते उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडत आहेत.
मुख्यमंत्रीपदाच्या हव्यासापोटी बाळासाहेबांचा विचारांना तुम्ही तीलांजली दिली. शरद पवार आणि सोनिया गांधी यांच्यासोबत युती केल्याचा कलंक तुमच्या माथी आहे. हा कलंक उद्धवजी तुम्ही कसा पुसणार? असा सवाल मंत्री गिरीश महाजन यांनी उद्धव ठाकरे यांना ट्विटरच्या माध्यमातून विचारला आहे.(girish mahajan kalank uddhav thakre)
https://twitter.com/girishdmahajan/status/1678595616283279362?s=20
याचबरोबर भारतीय जनता पक्षाचा नागपूरच्या कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरे यांचे बॅनर नागपूरमध्ये फाडून उद्धव ठाकरेंचा निषेध केला आहे. यामुळे महाराष्ट्रात सध्या गाजत असलेले हे कलंक प्रकरण अजूनही येत्या काही दिवस तरी नक्कीच गाजणार यात काही शंका नाही. नक्की हे प्रकरण पुढे कुठे जाऊन वळण घेत हे पाहण अतिशय उत्सुकतेच ठरणार आहे.(maharashtra kalank politics)