मंत्री गिरीश महाजनांचा मोठेपणा, वर्षभराचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीस

ऑक्टोबर 7, 2025 5:12 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ७ ऑक्टोबर २०२५ । महाराष्ट्रात गत सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिपावसामुळे शेतीचे झालेले नुकसान तसेच राज्यातील विविध भागात महापुरामुळे झालेले नुकसान यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीतून नागरिकांना मदत करण्यात येत आहे. यातच राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी मंत्रीपदाचा वर्षभराभरातील वेतन 31 लक्ष 18 हजार 286 रुपये मुख्यमंत्री सहायता निधीस दिले आहे. त्याबाबतचे धनादेश व संमतीपत्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आज ७ ऑक्टोबर रोजी मंत्रीमंडळाच्या बैठकी प्रसंगी सादर केले.

GM

आपला वर्षभराचा पगार देणारे ते राज्यातील पहिलेच मंत्री ठरले आहे. सद्याच्या मंत्री पदाची शपथ घेतल्या पासून डिंसेबर 2024 ते नोव्हेंबर 2025 या कालावधीचे संपूर्ण वेतन रु. ३१ लक्ष १८ हजार २८६ त्यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीस दिले आहे. पूर, दुष्काळ, आगीमुळे होणारे अपघात अशा मोठ्या नैसर्गिक आपत्तींमुळे बाधीत नागरिकांना “मुख्यमंत्री सहाय्यता निधी” मार्फत अर्थसहाय्य पुरविले जाते. अनेक सेवाभावी संस्था संस्था यांनी मुख्यमंत्री सहायता निधी दिले आहेत त्याचप्रमाणे लोकप्रतिनिधी देखील मानधन दिले आहे.

राज्यात मुसळधार पाऊस , तसेच महापुरामुळे प्रचंड नुकसान झालेले आहे. अनेक ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन पाहणी केलेली आहे. राज्याच्या जनतेच्या व शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीर आहे, शासनाकडून त्यांना योग्य ती मदत मिळत असताना आपला देखील त्यामध्ये सहभाग असावा म्हणून माझ्या सद्याच्या मंत्री पदाच्या वर्षे भराचे एकूण पगार रु. ३१ लक्ष १८ हजार २८६ मुख्यमंत्री सहायता निधीस देत आहे, असं मंत्री महाजन म्हणाले

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now