⁠ 
गुरूवार, सप्टेंबर 12, 2024
Home | जळगाव जिल्हा | काकीला मिशा असत्या तर.. ; जयंत पाटीलांच्या ‘त्या’ वक्तव्यावर मंत्री महाजनांची टीका..

काकीला मिशा असत्या तर.. ; जयंत पाटीलांच्या ‘त्या’ वक्तव्यावर मंत्री महाजनांची टीका..

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ ऑगस्ट २०२४ । भाजपचे नेते गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांच्यावर जोरदार टीका केली आहे. अजित पवार (Ajit Pawar) जर महाविकास आघाडीसोबत राहिले असते, तर ते मुख्यमंत्री झाले असते. अजितदादा महायुतीत गेले म्हणून ते मुख्यमंत्री झाले नाहीत, असं जयंत पाटील म्हणाले. यावरूनही गिरीश महाजांनी टीका केलीय.

काय म्हणाले गिरीश महाजन?
काकीला मिशा असल्या असता तर काय झालं असतं हे असं झालं आता… असं विषय काही होऊ शकत नाही, असं मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे. लाडकी बहीण योजनेवर देखील गिरीश महाजन यांनी भाष्य केलं आहे.

महिलांनी मत कमी दिली म्हणून महिलांसाठी ‘लाडकी बहिण योजना’ आणली, असं फेक निगेटिव्ह विरोधक सेट करत आहेत. लोकसभेत देखील विरोधकांनी खोटे निगेटिव्ह सेट करण्यात यश मिळालं मात्र आता तसं होणार नाही. आता सगळ्यांनी कान डोळे उघडे ठेवले आहेत… त्यामुळे विरोधकांच्या भुल थापणा जनता बळी पडणार नाही , यावेळचा निर्णय तुम्हाला वेगळा लागलेला दिसेल, असं गिरीश महाजन म्हणाले.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.