Ladki Bahin Yojana : मे महिन्याच्या हप्त्याबाबत मंत्री आदिती तटकरेंनी दिली महत्वाची अपडेट

जून 2, 2025 9:38 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । २ जून २०२५ । जून महिना उजाडला, पण अद्यापही लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याचा हप्ता महिलांच्या खात्यात जमा झालेला नाही. त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींचे लक्ष मे महिन्याचे हप्त्याकडे लागलं आहे. यादरम्यान मंत्री आदिती तटकरे यांनी महत्वाची अपडेट हाती आली आहे.

ladki bahin

मंत्री आदिती तटकरे म्हणाले, ‘लाभार्थ्यांची पडताळणी ही कोणत्याही योजनेच्या अंमलबजावणीतील सर्वसाधारण आणि नियमित प्रक्रिया आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीतही प्रक्रिया राबवली जातेय. या प्रक्रियेत सेवार्थ मधील जवळपास २ लाख अर्जांची पडताळणी केल्यानंतर त्यात सुमारे २२८९ सरकारी कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी नावनोंदणी केल्याची बाब जानेवारी- फेब्रुवारी दरम्यानच लक्षात आली आहे. तेव्हापासून अशा व्यक्तींना कोणताही लाभ वितरित करण्यात आलेला नाही’.

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ योग्य लाभार्थ्यांनाच देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असून, यासाठी अर्जांची पडताळणी ही नियमितपणे चालणारी प्रक्रिया असणार आहे, असे तटकरे यांनी सांगितले.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment