जळगाव लाईव्ह न्यूज । २५ एप्रिल २०२२ । पवित्र रमजान महिन्याच्या औचित्य साधून व मुस्लिम समाजाचे सामाजिक कार्यकर्ते अब्दुल सत्तार यांच्या संकल्पनेतून आवास फाऊंडेशन च्या वतीने १०१ बेवारस मनोरूग्णांना भोजन देण्यात आले.
अमळनेर शहरातील सेवाभावी आवास फाउंडेशनच्या मार्फत पवित्र रमजान महिन्याच्या १९व्या उपवास (रोजा) च्या दिवशी मानव सेवा तीर्थ अमर संस्था चोपडा तालुक्यातील वेले येथे व्यवस्थापक नरेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली १०१ बेवारस मनोरूग्णांना स्वादिष्ट भोजन देण्यात आले. विशेषत: या प्रसंगी जे मुस्लिम बांधव उपस्थित होते त्यांनी याच ठिकाणी रोजा इप्तारी केली. या प्रसंगी हाजी अब्दुल कादर जनाब, अब्दुल सत्तार, शब्बीर हाजी सत्तार शेख, अब्बासीया मस्जिदचे अध्यक्ष हाजी रफिक तेली, अमजद अली शाह, रियाज ठेकेदार, अज्जु बागवान, अख्तर तेली, रिजवान शेख, सईद शेख, सैय्यद आरीफ अली, आवास फाऊंडेशन अध्यक्ष अशफाक शेख, उपाध्यक्ष अहेमद अली सैय्यद, सचिव नविद शेख, जमालोदीन शेख, इंजिनिअर इम्रान कुरैशी आदि उपस्थित होते.