जळगाव जिल्हा

हतनूर धरणातून रब्बीसाठी पहिले आवर्तन सोडले; 37 हजार हेक्टर क्षेत्राला होणार लाभ

जळगाव लाईव्ह न्यूज । हतनूर धरण १० ऑक्टोबर रोजी शंभर टक्के भरल्यानंतरही तापी व पूर्णा नद्यांमधून धरणात अल्प प्रमाणात तरी आवक सुरू आहे. आगामी आठवडाभर ही आवक चालू राहण्याची शक्यता असून, धरणातील पाणीसाठा स्थिर राहील, असे चित्र आहे. दरम्यान, रब्बी हंगामासाठी धरणातून पहिल्या आवर्तनाला सुरुवात करण्यात आली आहे. यामुळे यावल व चोपडा तालुक्यातील तब्बल ३७ हजार हेक्टर क्षेत्राला फायदा होणार आहे.

hatnur

धरण भरल्यानंतरही सतत चालणारी आवक ही यंदाच्या हंगामाची वैशिष्ट्यपूर्ण बाब ठरली आहे. साधारणपणे दरवर्षी नोव्हेंबरमध्ये पहिले आवर्तन सोडले जाते; मात्र यंदा परतीच्या पावसामुळे जमिनीत पुरेसा ओलावा असल्याने पाटबंधारे विभागाने डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात आवर्तन देण्याचा निर्णय घेतला आहे.

यानंतर तापी नदीतील विसर्गामुळे शेळगाव बॅरेजमध्येही मुबलक जलसाठा उपलब्ध आहे. पुढील काही दिवस धरणात येणारी आवक कायम राहिल्यास साठ्याची पातळी स्थिर राहण्यास मदत होईल

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button