⁠ 
शनिवार, मे 18, 2024

..तर जळगाव शहरातील रस्त्यांची कामे पुन्हा रखडणार

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ मार्च २०२२ । मनपाला मिळालेल्या 42 कोटीच्या कामांच्या निविदेवर राज्य शासनाच्या नगरविकास खात्याचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी अद्याप स्वाक्षरी केली नाहीये. यामुळे ‘त्या’ कामांना ग्रीन सिग्नल अजूनही मिळालेला नाही. मात्र, जर ३१ तारखेच्या आत शिंदे यांनी ही सही केली नाही तर पावसाळ्या आधी शहरातील रस्ते बनणार नाहीत अशी माहिती मनपाच्या वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे. यामुळे शहरातील मुख्य रस्ते पावसाळ्याआधी खड्डे मुक्त होण्यासाठी ३१ मार्च आधी निविदेवर स्वाक्षरी होणे गरजेचे आहे.

डिसेंबर महिन्यात झालेल्या महानगरपालिकेच्या महासभेमध्ये 42 कोटींच्या कामांना मंजुरी मिळाली होती. यामध्ये जळगाव शहरातील प्रमुख रस्ते डांबरीकरण करण्याचे प्रस्ताव महासभेने बहुमताने पारित केले होते. मात्र या प्रस्तावाला राज्य शासनातर्फे ग्रीन सिग्नल दिला गेला नाहीये. यामुळे जर येत्या ३१ तारखे पर्यंत हा ग्रीन सिग्नल मिळाला नाही तर पावसाळ्या आधी हे रस्ते होणे शक्य नाही अशी माहिती मनपाच्या विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.

2019 साली राज्य शासनाच्या 42 कोटींच्या प्रस्तावामध्ये अनावश्यक कामे घेण्यात आली होती. म्हणून प्रस्तावाला स्थगिती दिली होती. व केवळ आवश्यक अशी कामे घेऊन हा प्रस्ताव पुन्हा सादर करावा असे आदेश दिले होते. यासाठी त्री समिती गठीत करण्यात आली होती. ज्यामध्ये पालकमंत्री गुलाबराव पाटील आयुक्त सतीश कुलकर्णी व जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांचा समावेश होता. यांनी पुढाकार घेत 42 कोटी च्या प्रस्तावामध्ये केवळ आवश्यक कामांचा समावेश केला. ज्यामध्ये शहरातील प्रमुख रस्त्यांच्या कामांचा समावेश होता. हा प्रस्ताव महासभेसमोर मंजूर करण्यात आला व महाराष्ट्र राज्य शासनाचा बांधकाम विभागाकडे मान्यतेसाठी पाठवण्यात आला.

मात्र अजून या प्रस्तावावर एकनाथ शिंदे यांनी सही केली नाहीये. गेल्या काही दिवसापासून मनपाच्या बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांच्या आणि संबंधीत ठेकेदाराच्या बैठका सुरु आहेत. मात्र अजून ४२ कोटीच्या निविदेवर शासनाची सही झाली नसल्याने पावसाळ्याआधी काम पूर्ण करायची कशी ? असा प्रश्न संबंधीत ठेकेदारांकडून उपस्थित केला जात आहे.