⁠ 
शुक्रवार, मे 17, 2024

कौटुंबिक न्यायालयात रोटरीकडून खेळणी, पुस्तकांसह साहित्य भेट

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० ऑक्टोबर २०२१ । रोटरी क्लब जळगावतर्फे कौटुंबिक न्यायालयात मुलांसाठी विविध खेळणी, म्युझीक सिस्टिम, पुस्तके, फळा आदी साहित्य भेट देण्यात आले. दरम्यान, त्या खोलीतील फळशीवर कारर्पेट देखील बसवून देण्यात आले.

यावेळी न्यायाधीश रितेश लिमकर, समुपदेशक डॉ. स्मिता जोशी, प्रबंधक प्रमोद नगरकर आणि रोटरी क्लबचे अध्यक्ष संदीप शर्मा, सचिव मनोज जोशी, माजी अध्यक्ष जितेंद्र ढाके, स्मिता ढाके, सुबोध सराफ आदी उपस्थित होते. कौटुंबिक न्यायालयामध्ये कौटुंबिक वाद मिटवण्याचे काम चालू असते. पती-पत्नीच्या वादात मुलांचे न्यायालयात आल्यावर खूपच हाल होतात. मुले आई किंवा वडीलांकडे असता आणि दुसरा पालक मुलांना भेटण्यासाठी न्यायालयात येत असतात, अशा वेळी मुले असुरक्षित वातावरणात असतात गोंधळलेली असतात व पालकांना भेटायला येताना घाबरलेली सुध्दा असतात म्हणूनच न्यायालयातील वातावरण न्यायालयासारखे न राहता आनंदी ,उत्साही व सकारात्मक राहावे, असे प्रयत्न केले जातात. म्हणून न्यायालयातील समुपदेशक डॉ. स्मिता जोशी यांनी याबाबत आमच्या रोटरी क्लबकडे हा विषय मांडला. त्याला प्रतिसाद देत रोटरी क्लब जळगावने या मुलांचा विचार करून हा उपक्रम राबविला, असे अध्यक्ष संदीप शर्मा यांनी सांगितले.