Pachora : प्रेम संबंधाला विरोध, विवाहित प्रेमी युगुलाने उचललं नको ते पाऊल..

जुलै 3, 2025 10:45 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । ३ जुलै २०२५ । जळगावच्या पाचोरा तालुक्यातील परधाडे येथे विवाहित असलेल्या प्रेमी युगुलाने रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कदायक घटना समोर आलीय. योगेश ठाकरे (वय ३५, रा. परधाडे) व मीना बबलू ठाकरे (वय २८, रा. परधाडे) असे दोघांचे नाव आहे.विशेष म्हणजे दोघेही विवाहित असून त्यांच्या या प्रेम संबंधाना विरोध झाल्याने त्यांनी टोकाचे पाऊल उचलले.

crime 7 jpg webp

गेल्या वर्षभरापासून दोघांमध्ये प्रेम होते. योगेशला पत्नीपासून तीन मुले व मीना हीस पती बबलू ठाकरे यांच्यापासून तीन मुले आहेत. मात्र दोघेही परधाडे गावात जवळ जवळ राहत होते. त्यांच्यात प्रेम संबंध जुळले. ही गोष्ट दोघांच्या कुटुंबीयांना माहित पडल्याने विरोध सुरु झाला. मंगळवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास दोघांनी घरातून पलायन केले. त्यानंतर बुधवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास मध्य रेल्वेच्या डाऊन ट्रॅकवरील खंबा नंबर ३८४ / २५ दरम्यान त्यांचा मृतदेह आढळून आला.

सदरची घटना परधाडे येथील गॅंगमनला दिसल्याने त्यांनी पाचोरा येथील स्टेशन मास्तरला व रेल्वे स्टेशनच्या ३४ भ्रमणध्वनी द्वारे कळविली. मात्र सदरचा प्रकार हा पाचोरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत परधाडे ते वडगाव दरम्यान घडल्याने घटनास्थळी पो. काॅ. योगेश पाटील, पो. काॅ. हरीश परदेशी, रुग्णवाहिका चालक किशोर लोहार, मंगेश पाटील यांनी जाऊन दोघ मयतांचे मृतदेह येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.

3 महिन्यांपासून बहिणीकडे, दोन दिवसांपूर्वी आला गावी
प्रेमसंबंधामुळे घरात वाद होत असल्याने योगेश गेल्या तीन महिन्यापासून त्याचा बहिणीकडे गेला होता. गेल्या तीन दिवसापूर्वीच योगेश घरी आल्यानंतर दोन दिवसातच ही घटना घडली. योगेश हा मुळचा धुळे जिल्ह्यातील शिरूड येथील होता. परधाडे येथे सासरी राहत होता. दरम्यान मीना हीचा पती बबलू ठाकरेला ही घटना कळताच सुरुवातीला त्याने पत्नीचा मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. मात्र, नातेवाइकांनी समजूत काढली.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now