सासरचांच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या, पतीला अटक

ऑगस्ट 2, 2021 1:26 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ०२ ऑगस्ट २०२१ । भुसावळ तालुकात्यातील पिंपळगाव खुर्द येथे सासरचांच्या छळाला कंटाळून विवाहितेने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. ज्योती अनिल सपकाळे (वय-३२) असे मयत विवाहितेचे नाव आहे. दरम्यान, माहेरच्या मंडळीच्या फिर्यादीवरून पतीसह सासू व नणंद यांच्यावर वरणगाव पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पतीला अटक केली आहे.

याबाबत असे की, ज्योती सपकाळे यांचा २०१३ मध्ये पिंगळगाव खूर्द येथील अनिल वसंत सपकाळे यांच्याशी विवाह झाला होता. विवाह दरम्यान पती अनिल यांनी पत्नी ज्योतीवर चरित्र्याचा संशय घेवून नेहमी शिवीगाळ व मारहाण करत होता. त्याचप्रमाणे सासू शकुंतलाबाई वसंत सपकाळे आणि नणंद योगीत गजानन सोनवणे सर्व रा. पिंपळगाव खूर्द यांनी विवाहितेला शिवीगाळ व टोमणे मारणे सुरू केले.

पती अनिल सपकाळे, सासू आणि नणंद यांच्या रोजरोजच्या छळाला कंटाळून विवाहिता ज्योती यांनी ३१ जुलै रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास घरात कुणीही नसतांना गळफास घेवून आत्महत्या केली.

याबाबत मयत विवाहितेच्या माहेरच्या मंडळींनी पती, सासू आणि नणंदवर आरोप केला. अखेर १ ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजता विवाहितेचा भाऊ सुर्यधन आंबादास कोळी यांच्या फिर्यादीवरून वरणगाव पोलीस ठाण्यात पतीसह सासू व नणंद यांच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल करताच वरणगाव पोलीसांनी संशयित आरोपी पती अनिल सपकाळे याला अटक केली. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीपकुमार बोरसे करीत आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now