पैशांसाठी विवाहितेचा छळ; गुन्हा नोंद

एप्रिल 20, 2022 4:17 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २० एप्रिल २०२२ । माहेरहून १५ लाख रूपये आणल्याशिवाय घरी यायचे नाही अशी धमकी पतीकडून देण्यात असल्याची बाब समोर आली आहे. या प्रकणी पीडित विवाहितेच्या तक्रारी वरून भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

CRIME 2 1 jpg webp

अधिक माहिती अशी की, रत्नमाला कृष्णा बावस्कर (वय-४१) रा. लक्ष्मीनगर जामनेर रोड, भुसावळ यांचा विवाह कृष्णा घनश्याम बावस्करी यांच्याशी रितीरिवाजानुसार झाला आहे. लग्नाचे काही वर्ष चांगले गेल्यानंतर विवाहितेला माहेरहून १५ लाख रूपये आणावे यासाठी मारहाण करण्यास सुरूवात केली. तसेच तू, जर माहेरहून १५ लाख रूपये आणले नाही तर घरी यायचे नाही अशी धमकी दिली. याबाबत विवाहितेन भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून पतीविरोधात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून कृष्णा बावस्कर याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ रविंद्र सपकाळे करीत आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now