⁠ 
गुरूवार, मे 2, 2024

५० हजारांसाठी विवाहितेचा छळ; ४ जणांविरोधात गुन्हा

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ जानेवारी २०२२ । शहरातील एका परिसरात माहेर असलेल्या २१ वर्षीय विवाहितेचा पतीसह सासरच्या मंडळींकडून दुचाकी घेण्यासाठी माहेरुन ५० हजार रुपये आणावे यासाठी छळ केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी पीडित महिलेच्या फिर्यादवरुन एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, जळगाव शहरातील तांबापुरा परिसरातील माहेरवाशीन तमन्नाबी इमरान शहा (वय-२१) यांचा भुसावळातील पापा नगरातील इमनान शहा इमाम शहा यांच्यासोबत रितीरिवाजानुसार विवाह झाला आहे. पतीला दुचाकी घ्यावयाची असल्याने माहेरून विवाहितेने ५० हजार रुपये आणावे, यासाठी पतीसह सासरच्या मंडळींकडून विवाहितेचा मानसिक व शारिरीक छळ केला जात होता. त्रास सहन न झाल्याने विवाहिता आपल्या माहेरी निघून आल्या. विवाहितेने गुरुवारी २७ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता पोलिसात धाव घेत तक्रार दिली. तिच्या तक्रारीवरून पती इमनान शहा इमाम शहा, सासरे इमाम शहा, सासू जरीनाबी इमाम शहा, नणंद सुलतानाबी इमाम शहा सर्व रा. पापानगर भुसावळ यांच्याविरुद्ध एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास नितीन पाटील हे करीत आहे.

हे देखील वाचा :