---Advertisement---
वाणिज्य

१ जूनपासून अनेक नियमांमध्ये होणार बदल ; थेट परिणाम तुमच्या खिशावर होईल?

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ मे २०२५ । मे महिना संपायला आता अवघे दोन दिवस उरले आहे. यांनतर जून महिन्याला सुरुवात होणार आहे. दरम्यान, दर महिन्याच्या पहिल्या तारखेप्रमाणे, १ जून २०२५ रोजी काही नवीन बदल होणार आहेत. १ जून रोजी होणाऱ्या या बदलांचा थेट परिणाम सामान्य माणसाच्या खिशावर आणि त्याच्या सेवांवर होईल. चला तर मग जाणून घेऊया १ जून रोजी कोणते मोठे बदल होऊ शकतात.

1st june 2022 jpg webp

एलपीजी गॅस
दर महिन्याच्या १ तारखेला एलपीजी गॅस सिलिंडरच्या किंमती अपडेट होतात. त्यामुळे जून महिन्यातदेखील एलपीजी गॅसच्या किंमती बदलणार आहेत.

---Advertisement---

ईपीएफओमध्ये काम सोपे होईल
सरकार १ जूनपासून ईपीएफओचे नवीन आवृत्ती ३.० लाँच करू शकते. याद्वारे पैसे काढणे, दावा करणे किंवा तपशील अपडेट करणे यासारख्या पीएफशी संबंधित सेवा पूर्वीपेक्षा सोप्या होतील. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे एटीएमसारख्या कार्डने पीएफ खात्यातून थेट पैसे काढता येतात.

क्रेडिट कार्ड
क्रेडिट कार्डच्याही नियमांमध्ये बदल होणार आहेत. ऑटो डेबिट फेल झाल्यावर त्यावर लागणारा २ टक्के दंड कमी होऊ शकतो. याबाबत नियम बदलू शकतो. इंधन आणि युटिलिटी बिल पेमेंटवर लागणाऱ्या शुल्काबाबतचेही नियम बदलू शकतात.

एटीएम नियमांमध्ये बदल
एटीएमच्याही नियमांमध्ये बदल होणार आहे. १ जूनपासून फ्रि लिमिटपेक्षा जास्त ट्रान्झॅक्शन करण्यावर फी वाढू शकते.

बँकचे नियम
जून महिन्यापासून बँकेच्या एफडीच्या नियमांमध्ये बदल होऊ शकतो. सध्या हे दर ६.५ ते ७.५ टक्के आहे. आरबीआयच्या नवीन पॉलिसीनुसार हे दर अपडेट होऊ शकतात.

पेट्रोल डिझेल
जर तुम्ही क्रेडिट कार्डद्वारे पेट्रोल डिझेलच्या पेमेंटवरील चार्जमध्ये बदल होऊ शकतात. यामुळे क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट करताना तुम्हाला कदाचित जास्त चार्ज किंवा कमी चार्जदेखील लागू शकतो.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---

Leave a Comment