जळगाव लाईव्ह न्यूज । २८ मार्च २०२५ । रेल्वे प्रवाशांसाठी एक महत्वाची बातमी आहे. मुंबईसह पुण्याहून भुसावळामार्गे कोलकाताकडे धावणाऱ्या अनेक रेल्वे गाड्या रद्द करण्यात आले आहे. संत्रागाची येथे यार्ड विस्ताराचे काम आणि बिलासपूर जवळ चौथ्या मार्गाचे जोडणी काम सुरू झाल्यामुळे या रेल्वे गाड्या एप्रिल महिन्यात रद्द करण्यात आल्या.

विशेष यातील बहुतांश गाड्या भुसावळ, जळगाव मार्गे धावणार असल्याने प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागणार आहे. रद्द झालेल्या गाड्यांमध्ये शालिमार, गीतांजलीसह अनेक गाड्यांचा समावेश आहे.
कोणत्या तारखेला कोणती गाडी रद्द :
गाडी क्र. २०८२२ – संत्रागाची-पुणे एक्सप्रेस – १४ एप्रिल आणि १९ एप्रिल रोजी रद्द
गाडी क्र.२०८२१ – पुणे -संत्रागाची एक्सप्रेस – १४ एप्रिल आणि २१ एप्रिल रोजी रद्द
गाडी क्र. १२८६९ सीएसएमटी मुंबई-हावडा गीतांजली एक्सप्रेस – १३ एप्रिल आणि २० एप्रिल रोजी रद्द
गाडी क्र. १२८७० – हावडा- सीएसएमटी मुंबई एक्सप्रेस – ११ एप्रिल आणि १८ एप्रिल रोजी रद्द
गाडी क्र.१२१५१ एलटीटी मुंबई- शालीमार एक्सप्रेस- ९, १०, १६ आणि १७ एप्रिल रोजी रद्द
गाडी क्र. १२१५२ शालीमार-एलटीटी मुंबई एक्सप्रेस – ११, १२, १८ आणि १९ एप्रिल रोजी रद्द
गाडी क्र.२२८९४ हावडा- साईनगर शिर्डी एक्सप्रेस – १० आणि १७ एप्रिल रोजी रद्द
गाडी क्र. २२८९३ साईनगर शिर्डी-हावडा एक्सप्रेस – १२ आणि १९ एप्रिल रोजी रद्द
गाडी क्र. १२८१२ हटिया- एलटीटी मुंबई एक्सप्रेस- ११, १२, १८ आणि १९ एप्रिल रोजी रद्द
गाडी क्र. १२८११ एलटीटी मुंबई- हटिया एक्सप्रेस – १३, १४, २० आणि २१ एप्रिल रोजी रद्द
गाडी क्र. १२१२९ पुणे- हावडा एक्सप्रेस – ११ आणि २४ एप्रिल रोजी रद्द
गाडी क्र. १२१३० हावडा-पुणे एक्सप्रेस – ११ आणि २४ एप्रिल रोजी रद्द
गाडी क्र. १२८५९ सीएसएमटी मुंबई-हावडा एक्सप्रेस- ११ आणि २४ एप्रिल रोजी रद्द
गाडी क्र. १२८६० हावडा- सीएसएमटी मुंबई एक्सप्रेस – ११ आणि २४ एप्रिल रोजी रद्द
गाडी क्र. १२२२२ हावडा-पुणे दुरांतो एक्सप्रेस – १०, १२, १७ आणि १९ एप्रिल रोजी रद्द
गाडी क्र. १२२२१ पुणे- हावडा दुरांतो एक्सप्रेस – १२, १४, १९ आणि २१ एप्रिल रोजी रद्द
गाडी क्र. १२९०५ पोरबंदर-शालीमार एक्सप्रेस – ९, १०, १६ आणि १७ एप्रिल रोजी रद्द
गाडी क्र. १२९०६ शालीमार-पोरबंदर एक्सप्रेस – ११, १२, १८ आणि १९ एप्रिल रोजी रद्द
गाडी क्र. १२१०१ एलटीटी मुंबई- शालीमार एक्सप्रेस – ११, १२, १४, १५, १८, १९,२१ आणि २२ एप्रिल रोजी रद्द
गाडी क्र. १२१०२ शालीमार-एलटीटी मुंबई एक्सप्रेस – १३, १४, १६, १७, २०, २१, २३ आणि २४ एप्रिल रोजी रद्द