मनवेलच्या तरुणाचा अचानक चक्कर येऊन पडल्याने उपचारादरम्यान मृत्यू

नोव्हेंबर 5, 2022 6:07 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ नोव्हेंबर २०२२ । यावल तालुक्यातील मनवेल येथील गावातच एका तरुणाला अचानक चक्कर आल्याने तो खाली कोसळला त्याला तातडीने यावल ग्रामीण रुग्णालयात व नंतर पुढे भुसावळ ट्रामा सेंटर येथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. दिपक गंगाराम काळे (वय 37) असे मयताचे नाव आहे. या प्रकरणी यावल पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

dipak jpg webp

दिपक हा तरुण शेतीकाम व शेतमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता मात्र घरी कोणी नसतांना अचानक चक्कर येऊन तो जमिनीवर कोसळला व त्याला तेथून यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये आणण्यात आले. येथे त्याच्यावर प्रथम उपचार करून तातडीने ट्रामा सेंटर, भुसावळ येथे हलवण्यात आले मात्र, तेथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी ट्रामा सेंटरच्या डॉक्टरांनी दिलेल्या माहिती नुसार यावल पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. यावलचे पोलिस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार सिकंदर तडवी तपास करीत आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now