⁠ 
मंगळवार, सप्टेंबर 17, 2024
Home | जळगाव जिल्हा | आता गिरीश महाजनकडे बघतोच.. इंगाच दाखवतो; मनोज जरांगेंचे थेट आव्हान

आता गिरीश महाजनकडे बघतोच.. इंगाच दाखवतो; मनोज जरांगेंचे थेट आव्हान

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ३ सप्टेंबर २०२४ । मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील हे सातत्याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत असतात मात्र आता जरांगे यांनी देवेंद्र फडणवीस यांचे सर्वात विश्वासू मंत्री गिरीश महाजन यांना टार्गेट केले आहे. त्यांनी मंत्री महाजन यांनी थेट आव्हान दिल आहे.

नेमकं काय आव्हान दिलं?
जामनेरमध्ये एक लाख वीस हजार मराठा आहेत. आता बघतोच गिरीश महाजनकडे… इंगाच दाखवतो… या शब्दांत मनोज जरांगेने गिरीश महाजनला आव्हान दिले आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे लोक मला येऊन गुपचूप भेटतात. ती लोक देवेंद्र फडणवीस यांच्यासंदर्भात तक्रार करतात. निवडणूक लढवण्याची वेळ आली तर मी सगळे उघड करेन. दहशतीने निवडणूक जिंकता येत नाही तर मायेने जिंकता येणार आहे, हे देवेंद्र फडणवीस यांनी समजून घ्यावे. देवेंद्र फडणवीस यांच्याशिवाय सरकारमधील पानही हलत नाही.‌ मुख्यमंत्री कोणीही असो पण निर्णय फडणवीस घेत आहेत.

मराठवाड्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास पोहचावा यासाठी आम्ही नाटक आणले होते. त्यात तोटा आला. आम्ही आमच्या परीने पैसे दिले. जबाबदारी वाटून घेतली. पण माझ्यावर देवेंद्र फडणवीस यांनी खोटा खटला दाखल केला, असा आरोप मनोज जरांगे यांनी केला.

दरम्यान, निवडणूक लढविण्याबाबत पुणे जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघांबाबत चर्चा झाली आहे. पण निर्णय कोणताही झाला नाही. पुन्हा एकदा बैठक घेऊ आणि मग ठरवू की निवडणूक लढवायची की २८८ पाडायचे आहेत. आम्ही आमची रणनीती उघड करणार नाही. अन्यथा देवेंद्र फडणवीस डाव करतील, असे मनोज जरांगे यांनी म्हटले आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.