⁠ 
गुरूवार, एप्रिल 25, 2024

स्वदेशीयांसह परदेशीयांनाही मंगळग्रह मंदिराची भुरळ

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ सप्टेंबर २०२२ । अमळनेर येथील श्री मंगळग्रह मंदिरात हल्ली देशातील सर्वच राज्यांतून भाविक व पर्यटक मोठ्या संख्येने येत आहेत. अनेक देशांमध्ये उद्योग, व्यवसाय तथा नोकरीनिमित्त स्थायिक झालेले परदेशस्थ भारतीय देखील नियमितपणे भारतात फक्त आणि फक्त श्री मंगळग्रह मंदिराच्या दर्शनासाठी व अभिषेकासाठीही मोठ्या संख्येने येत आहेत. त्यातच आता गेल्या काही वर्षांपासून परदेशी भाविक तथा पर्यटकांनाही या मंदिराने भुरळ घातली आहे. वर्षभरात अनेक परदेशी पर्यटक या मंदिराला आवर्जून भेट देत आहेत. आज फ्रान्स येथून आलेले वैज्ञानिक सेबॅस्टियन यांनी मंदिराला भेट दिली.

मंदिराचे सेवेकरी भरत पाटील, मनोहर तायडे व योगेश पाटील यांनी त्यांना मंगळग्रह सेवा संस्था व श्री मंगळग्रह मंदिराची सर्व माहिती सांगितली. संस्था तथा मंदिराच्या माध्यमातून होत असलेल्या सामाजिक कार्याबद्दल स्वतःच्या देशातही सांगणार असल्याचे सेबॅस्टियन यांनी आनंदाने सांगितले.