⁠ 
शनिवार, जानेवारी 11, 2025
Home | जळगाव जिल्हा | अमळनेर | मंगळग्रह सेवा संस्थेचा पर्यावरणात्मक उपक्रम जिल्हाभर राबविणार – जिल्हाधिकारी अभिजित राऊत

मंगळग्रह सेवा संस्थेचा पर्यावरणात्मक उपक्रम जिल्हाभर राबविणार – जिल्हाधिकारी अभिजित राऊत

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ६ जुलै २०२२ । निसर्गातील वेळोवेळी होणा-या बदलांवर मात करण्यासाठी पर्यावरण संरक्षणासह वृक्ष लागवडीची चळवळ गावा -गावात पोहोचणे गरजेचे आहे. त्या अनुषंगाने येथील मंगळग्रह सेवा संस्थेने वृक्ष दिंडी व पर्यावरण बचाव लोकचळवळ भव्य रॅलीचे आयोजन केले. हा अतिशय अभिनंदनीय व अनुकरणीय उपक्रम आहे. येत्या काळात मंगळ्ग्रह सेवा संस्थेचा हा उपक्रम ‘अमळनेर पॅटर्न’ म्हणून जिल्हाभर राबविण्यात येईल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केले.

मंगळग्रह सेवा संस्थेतर्फे धुळे रोडवरील साने गुरुजी विद्यामंदिराच्या मैदानातून दि. ३ जुलै रोजी सकाळी आठ वाजता प्रारंभ झालेल्या वृक्षदिंडी व पर्यावरण बचाव लोकचळवळ उपक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी संदीप घोरपडे व डॉ.अविनाश जोशी यांनी मनोगत व्यक्त केले. तालुक्यातील रंजाणे येथील युपीएससी परीक्षेत यशस्वी झालेल्या तुषार पाटील यांचा सत्कार राऊत यांनी केला. कार्यक्रमाचे विशेष अतिथी म्हणून माजी आमदार स्मिता वाघ, कॉग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार हे होते.

तर प्रमुख अतिथी म्हणून खानदेश शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष हरी भिका वाणी, संचालक डॉ.अनिल शिंदे अमळनेर शिक्षण मंडळाचे चिव संदीप घोरपडे, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रशासक तिलोत्तमा पाटील, जिजाऊ बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा ॲड, ललिता पाटील, लोकमान्य शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष विवेक भांडारकर, अमळनेर नगरपालिकेचे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, तहसीलदार मिलिंद वाघ, किसान शिक्षण प्रसारक मंडळ, झाडीचे अध्यक्ष धनगर दला पाटील, लायन्स क्लबचे अध्यक्ष योगेश मुंदडे, मराठी वाड्मय मंडळाचे अध्यक्ष डॉ. अविनाश जोशी, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष चंद्रकांत काटे, शहराध्यक्ष मनोज पाटील, काँग्रेस महिला आघाडी जिल्हाध्यक्षा सुलोचना वाघ, भाजपचे तालुकाध्यक्ष हिरालाल पाटील, शहराध्यक्ष उमेश वाल्हे, राष्ट्रवादी कॉग्रेसचे तालुकाध्यक्ष सचिन पाटील, शहराध्यक्ष मुक्तार खाटीक, ग्रामविकास शिक्षण संस्थेचे अध्यक्ष उदय नारायण पाटील, श्री योगेश्वर भगवान शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अँड, राजेंद्र चौधरी, साने गुरुजी वाचनालयाचे अध्यक्ष दिलीप सोनवणे, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष चंद्रकांत काटे ,अमळनेर पत्रकार संघाचे अध्यक्ष चेतन राजपूत, श्रमसाफल्य एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष इंजि. सुभाष भांडारकर, खानदेश शिक्षण मंडळाचे संचालक प्रदीप अग्रवाल, अमळनेर महिला मंच ट्रस्टच्या अध्यक्षा सौ. अपर्णा मुठे, खानदेश शिक्षण मंडळाच्या उपाध्यक्षा माधुरी पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या प्रा.रंजना देशमुख, अलका गोसावी अहिराणी साहित्यिक कृष्णा पाटील, रोटरी क्लबचे अध्यक्ष कीर्ती कोठारी, भगिनी मंडळाच्या अध्यक्षा सरोज भांडारकर, शिक्षणोत्तेजक मंडळ, मांडळचे अध्यक्ष नारायणराव कोळी, अमळनेर अर्बन बँकेचे व्हाइस चेअरमन प्रवीण पाटील, माजी संचालक मुन्ना शर्मा, पंचायत समितीचे माजी सभापती श्याम अहिरे, ऑल इंडिया लायनेस ऑर्गनायझेशनच्या अध्यक्षा सौ. शारदा विनोद अग्रवाल आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी पुरोहितांनी मंत्र जागर केला. याचवेळी सेलो कंपनीच्या वॉटर बॉटल्सचे प्रातिनिधीक स्वरूपात १५ विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले. जिल्हाधिकारी राऊत व प्रदीप पवार यांनी रॅलीला मंगलध्वज दाखवून उद्घाटन केले. दिंडीत शहरासह ग्रामीण शाळांतील मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि हजारो विद्यार्थी-विद्यार्थिनी सहभागी झाले होते. दिंडी मार्गावरील साने गुरुजींच्या पुतळ्याला पंचायत समितीचे माजी सभापती संदीप पाटील , राणी लक्ष्मीबाई यांच्या पुतळ्याला डॉ.अविनाश जोशी व नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्याला योगेश मुंदडे यांनी माल्यार्पण केले. पोलिस उपनिरीक्षक विकास शिरोळे व त्यांच्या सहकाऱ्यानी चोख बंदोबस्त ठेवला होता. पर्यावरणप्रेमींनी रॅली मार्गावर अनेक ठिकाणी पुष्पवृष्टी केली. चॉकलेट, गोळ्या व बिस्किटांचे वाटप करून विद्यार्थ्याचा आनंद द्विगुणित केला. दिंडी वाडी संस्थान परिसरात आल्यानंतर तेथे सहभागी शाळांच्या प्रतिनिधींना सहभाग प्रमाणपत्रांचे मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले. मंगळग्रह सेवा संस्थेचे उपाध्यक्ष एस. एन. पाटील,सचिव एस.बी.बाविस्कर, सहसचिव दिलीप बहिरम, खजिनदार गिरीश कुलकर्णी,विश्वस्त अनिल अहिरराव,सौ.जयश्री साबे, डी. ए.सोनवणे,आनंद महाले,विनोद कदम,सुबोध पाटील,आशिष चौधरी,विनोद अग्रवाल बाळा पवार,विशाल शर्मा, खिलू ढाके आदींसह अनेक सेवेकऱ्यानी कार्यक्रमाच्या यशस्वीते साठी सहकार्य केले. संस्थेचे अध्यक्ष डिगंबर महाले यांनी सूत्रसंचालन केले.

असा होता रॅली मार्ग
स्टेशन रोड-नगरपालिका-सुभाष चौक – राणी लक्ष्मीबाई चौक-सराफ बाजार- पानखिडकी-वाडी चौक-
वाडी चौक.

क्षणचित्रे
वृक्ष दिंडीचे महत्त्व पटवून देणारा आकर्षक रथ.
मंगळग्रह सेवा संस्थेतर्फे सहभागी साठी नाश्ता व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था.
स्व. एस. एस. पाटील माध्यमिक विद्यालय, (लोढवे) व गंगाराम सखाराम हायस्कूलच्या मुला-मुलींचे लेझीम पथक वृक्ष दिंडीतील आकर्षण.
अनेक विद्यार्थिनी नऊवारी साडी व अस्सल मराठी साजात डोक्यावर कलश तथा छोटेखानी तुळसी वृंदावनासह सहभागी झाले होते .
रविवार असूनही सर्व विद्यार्थी गणवेशातच.
समूहा-समूहाने दिंडीत सहभागासाठी येणाऱ्या विद्यार्थ्याचे ढोल-ताशांच्या गजरात स्वागत.
विद्यार्थ्यांच्या हाती पर्यावरण विषयक जन जागर करणारे शेकडो कलात्मक घोषवाक्यांचे फलक व ध्वज.
अमळनेरमधील विविध महिला मंडळांचाही आकर्षक वेशभूषेत उत्स्फूर्त सहभाग.
वारकरी पाठशाळा व वेद पाठशाळेचे विद्यार्थी वारकरी वेशात.
लायन्स क्लब,रोटरी क्लब व सोनार सराफ असोसिएशनचे अध्यक्ष राजू वर्मा यांच्या कडून पेयजल, गोळ्या -बिस्किटांचे
वाटप.
अत्यंत मनोहारी व कल्पक रांगोळ्यांनी वेधले सर्वांचे लक्ष

पहा रॅलीचा व्हिडिओ :
https://www.facebook.com/JalgaonLiveNews/videos/1186882238820341


author avatar
टीम जळगाव लाईव्ह