जळगाव लाईव्ह न्यूज । १७ ऑगस्ट २०२१ । पंधरा आगष्ट राव्हो का सव्वीस जानेवारी आम्हले बठ्ठा शाळाना पोरेस्ले “झेंडावंदन” सन वाटे मोठा. पंधरा दिन फाईनज तयारी सुरु व्हई जाये पंधरा आगष्टनी. देशभक्तीपर गाणा म्हणा साठे सरेस्फान नावे देत पोरं! मंग सर नेम्मन चालीस्वर बठाळी देत त्या गाना..दरोज गाणास्ननी प्रँक्टीस बी व्हये. आम्हनी शाळामा परतिज्ञा आणि झेंडावंदनन गाणं “विजयी विश्व तिरंगा प्यारा, झंडा ऊँचा रहे हमारा” म्हणाले आम्ही तीन पोरी -हाऊत. आम्हनी बी प्रँक्टीस व्हये चांगली. परतेक पोरगा पोरगीले आपला यूनिफार्म जास्त चमकाले पायजे आसज वाटे. आम्ही बठ्ठ्या पोरी चौदा तारीखले हाऊसमा मेंदी लावूत. प्रभात फेरीसाठे सरस्नी सा वाजताच बलायेल -हाये आमले. पण सकाय कवय हुई आणि कवय झेंडावंदनले जासू आस वाटे. इतला आनन -हाये की झोप बी लागे नै त्या दिन. चार वाजालेज उठी जाऊत. मी मामाना गावले शिकू घर इस्तरी नई व्हती तयव. मंग मनी आजी तांब्यामा गरम पानी लिसन इस्तरी करी दे कपडास्ले. मस्त धव्या मोज्या, काया बूटबी लेल व्हतात पप्पानी त्या घालू, मस्त तयार हुईसन आम्ही पोरी शाळामा बठ्ठास्ना पयले जाई भिडूत. शाळाना शेजारे ग्रामपंचायत व्हती तठे पयले झेंडावंदन व्हये आणि प्रभातफेरीले सुरुवात व्हये. एकमेकना हात धरीसन पोरे पोरीस्न्या रांगा लागेत. “एक रुपया चांदीचा, आमचा देश गांधीचा” आशा ब-याच घोषणा देत देत आम्ही दोन्ही गावे फिरीसन परत शाळामा इवूत. तठे आखो झेंडावंदन व्हये. तेनानंतर मंग सांस्कृतिक कार्यक्रम व्हये. गावमा माणशे बी गाणा आयकाले येत. जेन गाणं आवडे तेले खूशीमा रुप्या, दोन रुप्या, पाच रुप्या, धा रुप्या देत. आमले त्या पैसा म्हणजे मोठ्ठा खजिना वाटे. नंतर बक्षिस वितरणना कार्यक्रम व्हये. वही आणि पेन भेटे ते बी मोठ्ठ्या ट्राँफ्यासना गत वाटे. मंग शेवट गोया वाटेत बठ्ठा पोरेस्ले तेननंतर वंदेमातरम् व्हये आणि कार्यक्रम संपे. आज शाळास्मा मोठमोठा कार्यक्रम व्हतस झेंडावंदनना, कपडाबी तिरंगाना घालतस पोर पोरी, टोप्या -हातस आमना टाईमले ना पायस्मा धड चप्पल -हाये, ना शाळाना युनिफार्म नेम्मन -हाये, बिचारा ठिगय लाई लाई वापरेत पण तरीबी तवय जो आनन व्हये तो आज ना झेंडावंदन दखीसन वाटत नै हाई मातर खरं!
प्रतिक्षा पाटील