⁠ 
शुक्रवार, एप्रिल 26, 2024

माहेश्वरी दांडिया रास समितीतर्फे दांडिया रास स्पर्धांचे आयोजन

जळगाव लाईव्ह न्यूज । ३ ऑक्टोबर २०२२ । कोरोनाच्या तब्बल दोन वर्षानंतर यंदा गणेशोत्सवानंतर नवरात्री धुमधडाक्यात साजरी होत आहे. दरम्यान, दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा, माहेश्वरी बोर्डिंगच्या प्रांगणात, माहेश्वरी दांडिया रास समिती-२०२२ तर्फे माहेश्वरी समाजातील बांधवांसाठी नऊ दिवस भव्य दांडिया रास या स्पर्धांचे आयोजन केले आहे.

यावर्षी विशेष आकर्षण म्हणजे, माहेश्वरी स्टार सिंगर्स तर्फे, समाजातील गायकांनी अत्यंत सुमधुर लाईव्ह ऑर्केस्ट्रा ने दांडिया गरबा रास मध्ये उत्साह भरला आहे. याठिकाणी दररोज, तज्ञ आणि समाजाव्यतीरिक्त जजेस तर्फे ९ स्पर्धकांची निवड केली गेली आहे. त्या सगळ्यांना अनेक आकर्षक बक्षिसे देण्यात आलीत.

दि. ४ ऑक्टोबर रोजी,गत ८ दिवसातील सगळ्या विनर्स यांना ‘विनर्स ऑफ विनर्स’ राऊंड मध्ये टिव्ही संच, सायकल्स्, क्रॉकरी, इ. बक्षिसे देण्यात येणार आहेत. वरील आयोजनाचे वैशिष्ट्य म्हणजे, सप्तमी व अष्टमी रोजी विशेष राऊंडस् जसे ‘देवरानी-जेठाणी, नणंद-भौजाई, सासूबाई-सूनबाई, कपल्स्’ असे आकर्षक राऊंडस् आयोजित केलेले आहेत.

वरील आयोजनासाठी समाजातील अनेकांनी आर्थिक व सामाजिक योगदान दिले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समितीचे सर्व पदाधिकारी, कार्यकारिणी सदस्य आणि युवकांसह आबालवृद्धांनी प्रयत्न केलेत, असे प्रसिद्धी प्रमुख दिपक कासट कळवितात.