१०० टक्के मतदान करणार; माहेश्वरी समाजाचा निर्धार
जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव शहर व तहसील माहेश्वरी सभा आणि जळगाव शहर व तहसील माहेश्वरी महिला संघटना तर्फे संपूर्ण जळगाव शहरातील माहेश्वरी समाजासाठी नुकतेच कोजागिरी उत्सव २०२४ चे आयोजन आदित्य फॉर्म, येथे संपन्न झाली. त्यात २० नोव्हेंबर २०२४ रोजी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महत्व आपल्याला संविधानात असलेला हक्क & कर्तव्य मतदान करून देशाची लोकशाही बालकट करावी अशी विनंती येथील गांधी रिसर्च फाउंडेशन चे सहकारी आणि जळगाव जिल्हा विधान भेच्या निवडणुकीचे जिल्हा ऑयकाॅन श्री मदन रामनाथ लाठी करून सर्व माहेश्वरी समाजाने मतदान करण्याची शपथ या कार्यक्रमात घेण्यात आली.
सुरवातीस महेश वंदना जिल्हयातील जिल्हाध्यक्ष, जिल्हा सचिव & इतर मान्यवरांचे हाताने आरती संपन्न झाली. जळगाव शहर अंतर्गत सर्व ८ प्रभागांतर्फे उत्कृष्ट सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन तसेच लहान मुलांसाठी रोमांचक खेळांचे कार्यक्रम व तत्पश्चात भोजन व दुग्धपान आयोजित करण्यात आले होते.
आयोध्या नगर प्रभागाला – माता सरस्वती, आदर्श नगर प्रभागाला – प्रभू राम सीता, बालाजी पेठ प्रभागाला – राधाकृष्ण, महेश मार्ग प्रभागाला -शिवपार्वती, गणेश कॉलनी प्रभागाला – गणेश जी व रिद्धीसिद्धी, जिल्हा पेठ -नवी पेठ प्रभागला – विठ्ठल रुक्मिणी, पिंप्राळा प्रभागला- लक्ष्मीनारायण, प्रेम नगर प्रभागला – हनुमानजी असे वेगवेगळ्या देवी -देवतांवर १० मिनिटाची नाटिका सादर करण्याची थीम देण्यात आली होती.
जळगाव शहरातील माहेश्वरी समाजाचे जवळजवळ ३००० च्या वरती समाजबांधव या कार्यक्रमात सहभागी झाले होते.जळगाव शहर व तहसील माहेश्वरी सभा अध्यक्ष प्रमोद झवर, सचिव रमण लाहोटी, प्रकल्प प्रमुख गिरीश झवर, सहप्रकल्पप्रमुख राकेश लढ्ढा, नितीन कलंत्री आणि माहेश्वरी महिला संघटना अध्यक्षा पुष्पा दहाड, सचिवा कल्पना काबरा, प्रकल्पप्रमुख सीमा धुत, सहप्रकल्पप्रमुख मीनल लाठी, अर्चना जाखेटे, विशाल मंत्री, प्रशांत बियाणी व संघटनेच्या इतर सदस्यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी सहकार्य केले. तसेच आदित्य लॉन्सचे सुनील मंत्री यांचे विशेष सहकार्य या कार्यक्रमास मिळाले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निधी भट्टड, रमण लाहोटी, राणी लाहोटी, सोनाली जाजू यांनी केले.