---Advertisement---
नोकरी संधी

10वी उत्तीर्णांना महावितरणमध्ये मोठी संधी.. ‘या’ पदांसाठी निघाली भरती

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी खुशखबर आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेडमध्ये (Mahavitaran Recruitment 2024) भरतीची प्रक्रिया सुरु आहे. आता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी अवघे काही दिवसच शिल्लक आहेत. ही भरती प्रक्रिया 56 पदांसाठी होत आहे. इच्छुकांनी फटाफट या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावा. या भरतीसाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 31 जानेवारी 2024 आहे. Mahavitarn Bharti 2024

Mahavitaran Bharti jpg webp webp

रिक्त पदाचे नाव आणि पदसंख्या :
1) वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन) -25
2) तारतंत्री (वायरमन) – 25
3) कोपा -06

---Advertisement---

शैक्षणिक पात्रता : 01) महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ 10+2 बंधामधील माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक. 02) महाराष्ट्र औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधून वीजतंत्री, तारतंत्री, कोपा-पासा व्यवसायात उत्तीर्ण असणे व राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद, नवी दिल्ली यांनी दिलेले राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण प्रमाणपत्र किंवा महाराष्ट्र राज्य मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून तारतंत्री (वायरमन)/ वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन)/ कोपा) व्यवसाय प्रशिक्षण उत्तीर्ण असणे आवश्यक, आय.टी.आय. परीक्षा उत्तीर्ण

वयोमर्यादा : 18 ते 30
या पत्त्यावर अर्ज पाठवा :
या भरती प्रक्रियेसाठी अर्ज कार्यकारी अभियंता, म.रा.वि.वि.कं. मर्या, अमरावती ग्रामीण विभाग मेजर स्टोअर संकुल पॉवर हाऊस, अमरावती येथे पाठवावा. आॅनलाईन पद्धतीने अर्ज करणार असाल तर www.apprenticeshipindia.gov.in या वेबसाईटवरून करू शकता.
अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 31 जानेवारी 2024 आहे. त्यापूर्वीच आपल्याला या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावी लागणार आहेत.

जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---