---Advertisement---
शैक्षणिक नोकरी संधी

पोरांनो तयारीला लागा ; राज्यात लवकरच १० हजार पोलिसांची भरती होणार

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ मार्च २०२५ । पोलिस होण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आता राज्यात १० हजार पोलिसांची भरती केली जाणार आहे. राज्यात गणेशोत्सव झाल्यानंतर लगेचच पोलिस भरती होणार आहे.

police

गृह विभागाने २०२४ व डिसेंबर २०२५ पर्यंतची रिक्त पोलिसांची पदे भरण्याची मान्यता दिली. सध्या उन्हाळा सुरु आहे. उन्हाळ्यानंतर पावसाळा सुरु होणार आहे. त्यामुळे गणेशोत्सवानंतरच पोलिस भरतीची मैदानी चाचणी सुरु होणार आहे. साधारणपणे १५ सप्टेंबरनंतरच पोलिस भरतीची प्रक्रिया सुरु होईल, असं सांगण्यात येत आहे.

---Advertisement---

मागच्या वर्षी २०२४ मध्ये पोलिस भरतीच्या १७ हजार जागांसाठी १७ लाख अर्ज आले होत. दरम्यान, यंदा एकूण १० हजार पदे भरली जाणार असल्याने आताही काही लाखांमध्ये अर्ज येण्याची शक्यता आहे.

पोलिस भरतीचे निकष
पोलिस भरतीमध्ये एका पदासाठी एकाच ठिकाणी अर्ज करायचे आहे. जर तुम्ही जास्त अर्ज भरले तर ते बाद करण्यात येईल. दोन ठिकाणी अर्ज केल्याबद्दल उमेदवाराला बाद ठरवण्यात येईल. जर एखादा उमेदवार दुसऱ्या जिल्ह्यात उपस्थित राहिला तर त्याला दोन ठिकाणी अर्ज केल्याबद्दल चाचणी देता येणार नाही. या भरतीसाठी ४ महिन्याचा कालावधी लागण्याची शक्यता आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---

Leave a Comment