जळगाव लाईव्ह न्यूज । १८ मार्च २०२६ । गेल्या काही दिवसांपासून राज्यातील हवामान हवामानात मोठे बदल होताना दिसत असून एकीकडे उष्णेतेचा कडाका वाढला असताना राज्यात अवकाळी पावसाचा मोठा इशारा देण्यात आला आहे. ऐन मार्च महिन्यात राज्यात वादळी पावसासह गारपीट होत आहे. राज्यातील अनेक भागात काल पावसाने हजेरी लावली. दरम्यान आज देखील वादळी वाऱ्यांसह पावसाची आणि गारपिटीची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.याच पार्श्वभूमीवर अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.

राज्यातील २१ पेक्षा अधिक जिल्ह्यांमध्ये वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. हवामान खात्याने या सर्व जिल्ह्यांना येलो अलर्ट दिला आहे. विदर्भासाठी पुढचे काही दिवस महत्वाचे राहणार आहेत.

या जिल्ह्यांना अलर्ट?
आज चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, यवतमाळ या ७ जिल्ह्यांना पुढील ४८ तासांसाठी येलो अलर्ट जारी केला आहे. तर छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, लातूर, धाराशिव या ६ जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे. पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, अहिल्यानगर या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला.तर नाशिक, धुळे, नंदूरबार, जळगाव, रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये देखील पावसाचा अंदाज आहे. तर मुंबईत हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.
दरम्यान, विदर्भात १८, १९ तारखेला वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज आहे. धाराशिवमध्ये अवकाळी पावसासह गारपिटीची शक्यता आहे. या जिल्ह्यामध्ये कलिंगड आणि द्राक्ष बागांचे मोठे नुकसान झाले. लातूरमध्ये गारपीट आणि अवकाळी पावसाचा शेती पिकांना फटका बसला. ज्वारी हरभरा यासह आंबा, टरबूज फळबागांचे नुकसान झाले. लातूरमध्ये देखील अवकाळी पाऊस झाला. या पावसामुळे काढणीला आलेले ज्वारी हरभरा, यासह अंबा आणि टरबूज या फळबाग शेतीचे मोठं नुकसान झाले.
जळगावात काय स्थिती?
दरम्यान जळगाव जिल्ह्यात पावसाचा अंदाज आहे. मागच्या गेल्या दोन दिवसांपासून कमाल तापमानाचा पारा ४०वरून घसरून ३६ अंशांपर्यंत खाली आले आहे. त्यामुळे तापमानापासून काहीसा दिलासा मिळाला आहे. तसेचआज बुधवार आणि डुआय गुरुवार असे दोन दिवस तुरळक पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. जिल्ह्यात २३ मार्चपर्यंत हवामान मुख्यतः स्वच्छ, कोरडे आणि उष्ण राहील. तापमान ३७ ते ३९ अंशांदरम्यान राहील. बाकी दिवसांत आकाश निरभ्र राहील आणि उकाडा जाणवेल. या काळात आर्द्रता कमी राहील, हवा कोरडी जाणवेल, अशी माहिती हवामान अभ्यासक यांनी दिली







