जळगाव जिल्हा
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मराठी भाषा गौरव दिन साजरा
जळगाव लाईव्ह न्यूज । सुनिल महाजन । नशिराबाद येथे मराठी भाषा गौरव दिनानिमित्त जिल्हा परिषद मराठी शाळांमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने सलग ३७० विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व खाऊ वाटप करत अनोख्या पद्धतीने गौरव दिन साजरा करण्यात आला.
यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष लालचंद पाटील, मनसेचे शहर जिल्हाध्यक्ष जमील देशपांडे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष मुकुंद रोटे, महानगर अध्यक्ष किरण यशराज, शहराध्यक्ष जितेंद्र दशरथ, शहर सचिव गोकुळ धनगर, सचिन भालेराव, लक्ष्मण तायडे, समाधान केदार तेजस कुडी, गजेंद्र माळी, संजय कोळी आदी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.