जळगावात चक्कर येऊन पडल्याने तरुणाचा दुर्देवी मृत्यू

डिसेंबर 17, 2023 11:21 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ डिसेंबर २०२३ । चक्कर येऊन पडल्याने ४५ व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना जळगाव शहरातील मेहरूण परिसरातील जय भवानी नगरात घडली. किशोर अंबादास नेरकर (वय ४५, रा. जय भवानी नगर, जळगाव) असे मयत तरुणाचे नाव असून याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरु होते.

kishor nerkar jpg webp

याबाबत असे की, किशोर अंबादास नेरकर हा या. दे. पाटील शाळेजवळ आई, वडील, भाऊ, पत्नी, १ मुलगा, १ मुलगी यांच्यासह राहतो. या. दे. पाटील शाळेत विनाअनुदानित तत्वावर शिपाई म्हणून तो कार्यरत होता. शनिवारी तो दुपारी शाळेतून साडेबारा वाजता घरी आला. त्यानंतर त्याने जेवण केले. काही वेळानंतर घरातच त्याला चक्कर येऊन तो खाली कोसळला. त्याच्या मुलांनी, वडील जमिनीवर कोसळल्याचे पाहताच शेजारच्यांना आवाज दिला.

कुटुंबीय व आजूबाजूच्या नागरिकांनी त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. तेथे सीएमओ डॉ. सचिन पाटील यांनी तपासून त्यांना मयत घोषित केले. यावेळी कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. दरम्यान, याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरु होते.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now