जळगाव लाईव्ह न्यूज । ५ जानेवारी २०२१ । देशभरासह राज्यात कोरोनासह ओमिक्रॉन व्हेरियंटची लागण झालेल्या रुग्णांची संख्या प्रमाणात वाढत आहे. दिवसेंदिवस हा आकडा वाढत असून यामुळे राज्यात पुन्हा लॉकडाऊन लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे. पण अशातच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात तासभर बैठक पार पडली. या बैठकीत लॉकडाऊन संदर्भात दिलासा देणारा निर्णय घेण्यात आला आहे.
राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत असली तरी राज्यात तूर्तास लॉकडाऊन न लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, वाढती गर्दी आणि रुग्णसंख्या पाहता निर्बंध अधिक कडक करण्याचा विचार राज्यसरकारने केला आहे. तसेच कंटेन्मेट झोन वाढवणे, लसीकरण वेगाने करणे, रुग्णालयांची सज्जता आदींचा आढावा यावेळी घेण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं. या बैठकीची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना माहिती दिली जाणार आहे.
जळगाव जिल्ह्यात बाधितांच आकडा वाढतोय
काल जळगाव जिल्हा १३ नवीन कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. या १३ रुग्णांपैकी शहरातील ५, चोपडा येथील ४ तर भुसावळ येथील ३ रुग्ण आहेत. तर १ रुग्ण दुसऱ्या जिल्ह्यातील आहे. कालच्या रुग्ण वाढीनंतर जिल्ह्यात एकूण बाधित रुग्णांची संख्या ५२ वर गेली आहे. तर जिल्ह्यात आतापर्यंत एकूण १ लाख ४२ हजार ८६७ रुग्ण बाधित आढळून आले आहे. त्यापैकी १ लाख ४० हजार २३६ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत २ हजार ५७९ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.एन.एस.चव्हाण यांनी दिली आहे.
राज्यातील कोरोनाचा आकडा काय?
आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यात काल 18 हजार 466 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर 4 हजार 558 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात आज 20 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर राज्यात सक्रीय कोरोना रुग्णांची संख्या 66 हजार 308 वर पोहोचली आहे. कोरोनाच्या सुरुवातीपासूनची आकडेवारी पाहिली तर राज्यात आतापर्यंत 67 लाख 30 हजार 494 कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी 65 लाख 18 हजार 916 रुग्ण कोरोनातून पूर्णपणे बरे झाले आहेत. कोरोनामुळे झालेल्या मृत्यूची संख्या 1 लाख 41 हजार 573 झाली आहे.
दे देखील वाचा :
- जळगाव जिल्ह्यात कोरोनाची एंन्ट्री; एक जण कोरोना पॉझिटिव्ह
- सावधान! कोरोनानंतर आता ‘या’ धोकादायक आजाराचे जगात थैमान ; WHO कडून अलर्ट जारी
- वाकोदला कृषीचे पदवी महाविद्यालय सुरू करावे ; शरद पवारांचा अशोक जैन यांना सल्ला
- धोक्याची घंटा! नव्या कोरोना व्हेरिएंट ‘इरिस’ची यूकेत लाट, भारतासाठी धोका?
- ऑनलाईन शिक्षण पद्धतीचे दुष्परिणाम; पदवीच्या अंतिम वर्षात ६७ टक्के विद्यार्थी ‘नापास’