जळगाव लाईव्ह न्यूज । १६ डिसेंबर २०२४ । विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर ५ डिसेंबरला महायुतीचा शपथविधी सोहळा झाला. यात देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यानंतर बहुचर्चित फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार काल १५ डिसेंबर रोजी नागपुरात झाला. आता यांनतर विधानसभा निवडणुकीत महत्वाची भूमिका बजावणाऱ्या लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा हप्ता कधी येणार? असा प्रश्न महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना पडला आहे.
मंत्रिमंडळाचा विस्तार देखील झाला. मात्र डिसेंबर महिन्याचे दोन आठवडे उलटून देखील पात्र महिलांच्या बँक अंकाउंटमध्ये लाडकी बहिण योजनेचा सहावा हप्ता आलेला नाही. सध्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आहे परंतु अजून खातेवाटप बाकी आहे.
सुत्रांच्या माहितीनुसार, खातेवाटप झाल्यानंतर लाडकी बहीण योजनेचे पैसे दिले जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. महिला व बालविकास खाते ज्यांच्याकडे असेल ते जीआर काढतील. त्यानंतर पैसे महिलांच्या अकाउंटमध्ये जमा केले जातील, अशी माहिती समोर आलीय.